scorecardresearch

VIDEO : नोरा फतेहीवर आली दुचाकीवरुन प्रवास करण्याची वेळ, पाहा नेमकं काय घडलं?

महागड्या कारने नव्हे तर स्कूटरवरुन प्रवास करतानाचा नोरा फतेहीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

nora fatehi, nora fatehi eid look, nora fatehi on activa,
महागड्या कारने नव्हे तर स्कूटरवरुन प्रवास करतानाचा नोरा फतेहीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेत्री नोरा फतेहीच्या लूकचे, तिच्या नृत्याचे लाखो चाहते आहेत. एखादा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला की काही तासांमध्येच तिच्या फोटोंवर लाईक, कमेंट्सचा वर्षाव होतो. पाहताक्षणीच कोणीही प्रेमात पडेल असाच तिचा लूक आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणेच नोरालाही महागडे कपडे परिधान करणं, महागड्या कारमधून फिरणं आवडतं. तिच्या प्रत्येक फोटो, व्हिडीओची चर्चा ही होतेच. ईदच्यानिमित्ताने नोरा सुंदर तयार झाली. ती तिच्या इमारतीमधून बाहेर पडताच महागड्या कारमध्ये न बसता स्कूटरवर बसून निघून गेली.

महागड्या कारमधून फिरणाऱ्या अभिनेत्रीने स्कूटरवरून प्रवास करण्याचं ठरवलं. नोरा आपल्या इमारतीमधून बाहेर पडली आणि स्कूटरवर बसताच इतर लोकंही तिच्याकडे वळून-वळून पाहत राहिले. नोरा कारने नव्हे तर स्कूटरने जात असल्याचं पाहून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तसेच तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी विविध कमेंट्स देखील केल्या आहेत.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीला झालंय काय? ब्लाऊज न घालताच नेसली साडी, नेटकरी म्हणाले…

या व्हिडीओमध्ये नोराने पारंपरिक ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. नोरा स्कूटरने का बरं गेली असेल? असा प्रश्न देखील अनेक जण विचारताना दिसत आहेत. पण बहुदा मुंबईमधील ट्राफिकपासून सुटका मिळावी म्हणून तिने दुचाकीने प्रवास करायचा असं ठरवलं असावं.

आणखी वाचा – नोरा फतेहीच्या प्रेमात होता टेरेंस? रिलेशनशिपच्या चर्चांबाबत कोरियोग्राफरने सोडलं मौन

नोराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अगदी कमी वेळामध्येच सिनेसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. तिला नृत्य करताना पाहून तर अनेकांच्या भूवया उंचावतात. सुपरहिट हिंदी गाण्यांमध्ये नोराच्या दिलखेच अदा आपण पाहिल्याच आहेत. सध्या ती डान्स रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदाची धुरा सांभाळताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nora fatehi ditches luxury car rides scooter to beat mumbai traffic video viral on social media kmd