नोरा फतेही सांगतेय आगीसोबत नाचण्याचा अनुभव

मला प्रेक्षकांना दाखवायचे होते की, मी या गाण्यात काहीतरी नवीन केले आहे

नोरा फतेही

आपल्या डान्स मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. आता नोरा ‘ओ साकी साकी’ गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हे गाणे जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट ‘बाटला हाउस’ मधील आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून या गाण्यातील दिलखेचक अदांनी नोराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

२००४ मधील चित्रपट ‘मुसाफिर’मधील ‘साकी’ हे गाणे यानिमित्ताने नव्याने प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. नोरा या गाण्यामध्ये आगीशी खेळताना दिसत आहे. हे गाणे नेहा कक्कर आणि तुलसी कुमार यांनी गायले असून तनिष्क बागचीने रिक्रिएट केले आहे. नोरा गाण्यामध्ये बेली डान्स करताना दिसत आहे. तिचे हे गाणे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

या अनुभवाविषयी बोलताना नोरा म्हणाली की, “या गाण्यात काम करणे माझ्यासाठी स्वप्नवत होते. तनिष्कने या गाण्यात खूपच कमाल केली आहे. मला त्या गाण्याला योग्य न्याय द्यायचा होता. मी पहिल्यांदा आगीसोबत नाचले आहे. फक्त तीन दिवसातच मी हे नृत्य शिकले.” हे गाणे शूट करताना आलेल्या अडचणींविषयी सुद्धा ती म्हणाली की, “फायर फॅन्स खूप जड होते. त्यांच्यासोबत नाचणे ही अवघड गोष्ट होती. पण, मला प्रेक्षकांना दाखवायचे होते की मी या गाण्यात काहीतरी नवीन केले आहे.”

हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nora fatehi fire dance batla house djj

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या