नोरा फतेहीचा राजेशाही थाट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

नोरा लवकरच ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटात जॉन अब्राहम सोबत दिसणार आहे.

nora fatehi, nora fatehi instagram,
नोरा लवकरच 'सत्यमेव जयते २' या चित्रपटात जॉन अब्राहम सोबत दिसणार आहे. (Photo Credit : Nora Fatehi Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोरा तिच्या डान्ससोबतच फॅशनमुळे ही ओळखली जाते. नोरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच नोराने सोशल मीडियावर एक फोटो फोटो शेअर केला आहे. सोबतच तिचे काही ग्लॅमरस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

नोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. नोराने या फोटोत ब्रालेट आणि लेहेंगा परिधान केला आहे. नोरा या राजेशाही शैलीतील लूकमध्ये सुंदर दिसत आहे. नोराचा हा ब्लॅक अॅंड व्हाइफ फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “आम्ही दोघांनी अजुन लग्न केले नाही…”,सलमान खानने केला त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा

या सोबतच नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नोरा केक कट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ दिल्लीतील आहे. हा व्हिडीओ पोस्ट पॅकएक व्हिडीओ आहे.

आणखी वाचा : ‘इन्स्पेक्टर साहेब बसले आहेत आणि एसपी साहेब…’, अक्षयच्या पोस्टवर कमेंट करत पोलिस अधिकाऱ्यांनी केले ट्रोल

नोराने २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रोर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नोरा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि शरद केळकरसोबत दिसली होती. यानंतर नोरा जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी नोराने तिला माधुरी दीक्षितच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा जाहिर केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nora fatehi looks like a queen in royal avatar photo viral dcp