Nora Fatehi Car Accident: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीच्या गाडीचा मुंबईत अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकन डीजे डेव्हिड गुएटाच्या सनबर्न कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. एका मद्यधुंद चालकाने नोरा फतेहीच्या कारला जोरदार धडक दिली. यानंतर तिच्या टीमने तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी सीटी स्कॅन करून अंतर्गत रस्तस्त्राव किंवा दुखापत झाला आहे का? याची तपासणी केली. नोरा फतेहीला गंभीर दुखापत झाली नसली तरी या घटनेमुळे तिला मानसिक धक्का बसल्याचे सांगितले जाते. ही बातमी हिंदुस्तान टाइम्स या संकेतस्थळाने दिली आहे.
सूत्रांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असतानाही नोरा फतेहीने तिचे व्यावसायिक कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती शनिवारी रात्री होत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हलसाठी गेली.
नोरा फतेही किंवा तिच्या टीमकडून अपघाताबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.
Nora Fatehi was involved in an unfortunate car accident, while on her way to the Sunburn Festival for her scheduled appearance with David Guetta, as a drunk driver rammed into her car. Her team immediately rushed her to the nearest hospital where the doctors conducted a CT scan… pic.twitter.com/ASsLq2KeWa
— India Forums (@indiaforums) December 20, 2025
नोरा फतेही अमेरिकन डीजे डेव्हिड गुएटासह एकाच मंचावर सनबर्न फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करणार होती. गेल्या काही वर्षांपासून नोरा फतेही जागतिक किर्तीच्या कलाकारांसह कॉन्सर्ट आणि आंतरराष्ट्रीय अल्बममध्ये दिसून येत आहे. जेसन डेरुलोचे स्नेक आणि ओह मामा टेटेमा या गाण्यांमध्ये ती दिसली. तसेच जमैकन गायिका शेन्सीयाबरोबर ती ‘व्हॉट डू आय नो?’ या गाण्यात एकत्र दिसली होती.
तसेच अमेरिकन कलाकार जिमी फॅलोनच्या टुनाईट शोमध्ये नोरा फतेहीने ‘व्हॉट डू आय नो?’ या गाण्यावर नृत्य सादर केले होते. अनटोल्ड दुबई इंटरनॅशनल म्युझिक फेस्टिव्हलमध्येही नोरा फतेहीने आपल्या नृत्याचे सादरीकरण केले होते.
चित्रपटांच्या बाबत बोलायचे झाल्यास नोरा फतेही या वर्षात बी हॅप्पी, उफ्फ ये सियापा आणि थम्मा या चित्रपटांमध्ये दिसली. बी हॅप्पीमधील अभिनय आणि थम्मामधील आयटम साँगमुळे तिचे नाव चर्चेत होते. काही काळापूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या द रॉयल्स या वेबसीरीजमध्येही ती दिसली होती.
