बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची डान्सर म्हणजे नोरा फतेही. ‘दिलबर’ या गाण्याने नोराला ओळख मिळाली आणि त्यानंतर तिच्या दमदार डान्सने तिने चाहत्यांना घायाळ केलं. तसचं बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नोरा कायम चर्चेत असते. आपल्या डान्सच्या जादूने नोराने चाहत्यांनी मनं जिंकली असली तरी बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात नोराला मोठा संघर्ष करावा लागला आहे. खास करून भाषेच्या अडथळ्यामुळे नोराची अनेकांनी थट्टा उडवली असल्याचा खुलासा नुकताच तिने एका मुलाखतीत केलाय.

पिंकविलाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नोराने भाषेच्या अडथळ्यामुळे ती एक थट्टेचा विषय बनली होती असा खुलासा केलाय. नोराने हिंदी शिकण्यास सुरुवात केली असली तरी सुरुवातीच्या काळात ऑडिशन्स देणं तिच्यासाठी खूप कठिण झालं होतं. मानसिकदृष्ट्या ती ऑडिशन्ससाठी तयार नसायची असा खुलासा तिने केलाय. नोरा म्हणाली, “अनेकदा लोक सर्कस पाहत असल्यासारखं माझ्याकडे बघून हसायचे. काहीवेळा तर मी ऑडीशनहून रडत घरी परतले आहे.” असं देखील नोरा म्हणाली.

“हे खूप बेकार वाटतं”, अमिताभ बच्चन यांच्या सूटवर स्पर्धकांने कमेंट करताच बिग बींनी दिलं ‘हे’ उत्तर

मोठ्या संघर्षानंतर नोराने तिची बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाउस’ सिनेमात नोराने एक छोटीशी भूमिका साकारली होती. शिवाय या सिनेमातील तिचं ‘ओ साकी साकी’ हे गाणं देखील प्रचंड गाजलं होतं. रेमो डिसुजाच्या ‘एबीसीडी-३’ आणि सलमानच्या ‘भारत’ या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या होत्या. नुकतीच नोरा नोरा अजय देवगणच्या ‘भुजः द प्राइड इंडिया’ या सिनेमात झळकली होती.