नोरा फतेहीलाही करोनाची लागण, इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नोरा फतेहीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

nora fatehi, covid 19, coronavirus, covid positive, nora fatehi covid positive, nora fatehi instagram, नोरा फतेही, करोना व्हायरल, कोविड १९, नोरा फतेही इन्स्टाग्राम
नोरा फतेहीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

मागच्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना अलिकडच्या काळात करोनाची लागण झालेली दिसत आहे. करिना कपूर, अमृता अरोरा, अर्जुन कपूर, अंशुला कपूर या बॉलिवूड सेलिब्रेटींच्या पाठोपाठ आता नोरा फतेहीची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात नोरानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

नोरा फतेहीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तिने लिहिलं, ‘मी सध्या करोनाचा सामना करत आहे. खरं सांगू तर हे सर्व खूप कठीण आहे. मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि मास्क वापरा. हा विषाणू खूप वेगाने पसरताना दिसत आहे. माझं दुर्दैव आहे की मला करोनाची लागण झाली आहे. या विषाणूची लागण कोणालाही होऊ शकते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. तुमच्या आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही. सुरक्षित राहा.’

दरम्यान मागच्या काही दिवसांत नोरा तिचं अल्बम साँग ‘डान्स मेरी रानी’चं जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. यासाठी तिने वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्येही हजेरी लावली होती. तिच्यासोबत या प्रमोशनसाठी गायक गुरु रंधावा देखील उपस्थित होता. त्यामुळे त्यालाही करोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नोराच्या अगोदर कपूर कुटुंबीयांपैकी अर्जुन कपूर, रिया कपूर, अंशुला कपूर तसेच अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनाही करोनाची लागण झाली आहे. अलिकडच्याच काळात अभिनेत्री करिना कपूर, अमृता अरोरा यांनाही करोनाची लागण झाली होती. पण त्यांनी करोनाला मात दिली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nora fatehi tested covid positive her instagram post goes viral on social media mrj

Next Story
SRKने सनी लिओनीला देवी बनवले…, अभिनेत्याचा शाहरुखवर निशाणा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी