nora fatehi viral video in rain bodygaurd helping carrying her saree kpw| स्वत:ला साडी सांभाळता येत नाही का?"; नोरा फतेहीवर नेटकरी संतापले | Loksatta

“स्वत:ला साडी सांभाळता येत नाही का?”; नोरा फतेहीवर नेटकरी संतापले

नोरा फतेहीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

“स्वत:ला साडी सांभाळता येत नाही का?”; नोरा फतेहीवर नेटकरी संतापले

अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीचे लाखो चाहते आहेत. नोराच्या घायाळ करणाऱ्या अदांनी आजवर अनेकांना भुरळ घातली आहे. मात्र नोराने सध्या चाहत्यांचा रोष ओढावून घेतलाय आणि यासाठी कारण ठरला आहे तो म्हणजे मुंबईचा पाऊस.

मुंबईतील पाऊस म्हंटलं की रस्त्यावरून चालण्याची अनेकदा मोठी पंचायत असते. असंच काहीसं नोरासोबतही झालं. नोरा फतेही जेव्हा ‘डान्स दिवाने’ शोच्या सेटवर पोहचली तेव्हा नेमकीच पावसाने हजेरी लावली होती. यावेळी नोराने फिक्या गुलाबी रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. मात्र पावसामुळे तिला साडी सावरणं कठीण झालं होतं. यासाठी तिने तिच्या बॉडीगार्डची मदत घेतली. नोराचा गाडीतून उतरतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.

सिनेफोटोग्राफर मानव मंगलानी यांनी नोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ज्यात नोरा गाडीतून उतरताना दिसतेय. पाऊस पडत असल्याने एका बॉडीगार्डने नोरासाठी छत्री पकडली आहे. तर दुसरा बॉडीगार्ड नोराची साडी आणि पदर सांभाळताना दिसत आहे. यावेळी तो स्वत: पावसात भिजून नोराची साडी भिजू नये म्हणून प्रयत्न करताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र संतापले आहेत. अनेकांनी तिला ट्रोल केलंय.

या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “तुम्ही घातलेले कपडे दुसऱ्यांनी सांभाळायचे.” तर आणखि एक युजर म्हणाला, “स्वत:चे कपडे सांभाळणं इतकही कठीण नाही.” आणखी एक म्हणाला, “ही कुठली महाराणी आहे.”

‘आरआरआर’ ही एक गे लव्हस्टोरी; आलिया भट्ट तर फक्त….

(फोटो सौजन्य- मानव मंगलानी)

नोराच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “हे खुपच वाईट आहे. मदतनीसांना ती गुलाम म्हणून वागवतेय. अशा फिल्म स्टार्सना महत्व देणं थांबवलं पाहिजे.” तर अनेक नेटकऱ्यांनी नोरावर टीका केलीय. तर तिच्या बॉडीगार्डबद्दल सहानुभूती व्यक्त केलीय.

नोराने तिच्या जबरदस्त डान्सने बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलंय. सध्या नोरा ‘डान्स दिवाने ज्युनियर’ या शोमध्ये जजची भूमिका पार पाडतेय.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“मी साधूच्या वेशात पंढरपुरामध्ये बसलो होतो आणि…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

संबंधित बातम्या

…म्हणून दिग्दर्शक रवी जाधवने पुन्हा केलं लग्न; पत्नीनेच पोस्ट केलेल्या फोटोमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा
हंसिका मोटवानीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ; जंगी विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
“माझ्यावर विश्वास ठेवा मी…” मानसी नाईकच्या पतीच्या पोस्टने वेधले लक्ष
“आमच्या नात्यात दुरावा…” ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांना सायली संजीवने दिला पूर्णविराम

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मवाली चित्रपटातील ‘तो’ एक सीन अन् शक्ती कपूर यांनी बॉलिवूड सोडण्याचा घेतला होता निर्णय; आठवण सांगत म्हणाले…
“बेळगाव दौरा अद्याप तरी रद्द केलेला नाही”; मंत्री शंभूराज देसाईंचं विधान!
पुणे : सदनिकेत प्लंबिंग काम करताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू ; वारजे भागातील घटना
“२००३ ला मी ऑडिशन…” सिद्धार्थ जाधवने सांगितला ‘तुंबाड’ चित्रपटाबद्दलचा ‘तो’ किस्सा
धक्कादायक: प्रेषित म्हणवणाऱ्या या गृहस्थाला २० पत्नी; आपल्याच कोवळ्या मुलीशीही केला विवाह