ठरलं! करीना नाही तर कंगना साकारणार सीतेची भूमिका

हा चित्रपट तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

kareena kapoor khan, kangana ranaut, the incarnation sita,
हा चित्रपट तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

गेल्या काही दिवसांपूर्वी केव्ही विजयेंद्र प्रसाद यांच्या ‘The Incarnation- SITA’ या चित्रपटाची चर्चा सुरु होती. या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी बॉलिवूडची बेबो करीना कपूरच्या नावाची चर्चा देखील सुरु होती. एवढंच नाही तर तिने या भूमिकेसाठी १२ कोटी रुपये मानधन मागितले होते. मात्र, आता या चित्रपटात सीतेची भूमिका ही बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत साकारणार आहे.

कंगनाने या चित्रपटाचे पोस्टर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत ‘The Incarnation- Sita’ या चित्रपटात काम करायला मिळत असल्याने आनंद झाला आहे. सीता राम यांच्या आशीर्वादाने…जय सियाराम’, असे कॅप्शन कंगनाने दिले आहे. कंगना सीतेची भूमिका साकारणार हे कळताच तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या एसएस स्टुडिओच्या निर्मात्या सलोनी शर्मा यांनी म्हटले आहे की, ‘एक स्त्री म्हणून कंगनाचे स्वागत करण्यात मला खूप आनंद होतं आहे. ‘The Incarnation Sita’ या चित्रपटात कंगना एक भारतीय महिला किती निर्भयी असते याची प्रमिता साकारणार आहे.’

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि साई पल्लवीच्या ‘लव्ह स्टोरी’ वर समांथा म्हणाली…

यापूर्वी चित्रपटाचे लेखक केव्ही विजयेंद्र प्रसाद यांनीही सांगितले होते की ‘सीतेचे भूमिका साकारण्यासाठी त्यांच्या डोक्यात फक्त कंगनाचे नाव येत आहे.’ या चित्रपटाचे डायलॉग हे मनोज मुंटाशीर यांनी लिहिलेले आहेत. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

आणखी वाचा : सैफने मुलगा जहांगीरबद्दल केलं असं वक्तव्य की कपिल शर्माला हसू झालं अनावर

दरम्यान, कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कंगनाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकरली होती. आता कंगना लवकरच ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Not kareena kapoor kangana ranaut will play the role of goddess sita in film the incarnation sita dcp

ताज्या बातम्या