Video : गडद अंधार, चमकत्या वीजा अन्… ‘लपाछपी’च्या हिंदी रिमेकचा थरारक प्रोमो प्रदर्शित

हा हॉरर चित्रपटाचा प्रोमो असल्याने तो पाहिल्यावर अक्षरश: अंगावर काटा येतो.

बॉलिवूडची अभिनेत्री नुशरत भरूचा ही नेहमीच काही ना कारणामुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. बोल्ड फोटोमुळे चर्चेत असलेली नुशरत भरुचाने नुकतंच तिच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ‘छोरी’ असे तिच्या आगामी हॉरर चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित केला जाणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

नुशरतने नुकतंच शेअर केलेल्या प्रोमोत एक महिला लाल रंगाच्या लेहंगामध्ये बसलेली दिसत आहे. ही महिला गरोदर असून भूत असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्रीच्या गडद अंधार, चमकत्या वीजा आणि गच्चीवर बसलेली भूत या प्रोमोत पाहायला मिळत आहे. त्यानंतर ‘छोरी’ असे चित्रपटाचे नाव दिसते. हा हॉरर चित्रपटाचा प्रोमो असल्याने तो पाहिल्यावर अक्षरश: अंगावर काटा येतो. या चित्रपटाच्या माध्यमातून नुशरत पहिल्यांदाच एखाद्या हॉरर चित्रपटात काम करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिचे चाहते तिला पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत.


“भीतीचा एक नवीन चेहरा आपल्याला त्रास द्यायला येत आहे, छोरी ऑन प्राईम,” असे कॅप्शन नुशरतने या व्हिडीओला दिले आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात हा हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही तिने यात सांगितले आहे. मात्र तो कधी प्रदर्शित होणार याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान नुशरत ही पहिल्यांदाच एका हॉरर चित्रपटात काम करत असल्याने तिचे चाहते तिला पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

नुसरत भरुचासह या चित्रपटात मीता वशिष्ठ, राजेश जैस आणि सौरभ गोयल हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. छोरी हा चित्रपट लपाछपी या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. नुसरतने २००९ मध्ये ‘कल किसने देखा’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर‘प्यार का पंचनामा’,‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘ड्रीम गर्ल’ और ‘छलांग’ यासारख्या अनेक चित्रपटात ती झळकली. तिचे हे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nushrratt bharuccha horror chhorii movie premiere on amazon prime video in november 2021 nrp

ताज्या बातम्या