scorecardresearch

Premium

‘जनहित में जारी’ या चित्रपटात कंडोम विकताना दिसणार नुसरत भरुचा

लोकप्रिय दिग्दर्शक राज शांडिल्य या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

‘जनहित में जारी’ या चित्रपटात कंडोम विकताना दिसणार नुसरत भरुचा

अभिनेत्री नुसरत भरुचा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नुसरत ‘जनहित में जारी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात नुसरत कंडोम विकताना दिसणार आहे. या भूमिकेविषयी नुसरतने एका मुलाखतीत सांगितले आहे.

नुसरत तिच्या भूमिकेविषयी बोलताना म्हणाली, “मी आता पर्यंत जेवढे चित्रपट केले त्यात मी ग्लॅमरस भूमिका साकारली त्यात ‘प्यार का पंचनामा’, ‘कल किसने देखा है’, ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ हे चित्रपट आले. परंतु ‘छलांग’ नंतर माझ्यातली प्रतिभा सगळ्यांना दिसली आणि मी सिद्ध केले की मी ग्लॅमरच्या पलीकडे जाऊन काहीही करु शकते.”

animal-mahesh-babu
रणबीर कपूर नव्हे तर ‘हा’ दाक्षिणात्य स्टार होता ‘अ‍ॅनिमल’साठी दिग्दर्शकाची पहिली पसंती
Animal Teaser
Animal Teaser : रणबीर कपूरचे हिंस्त्र रुप, जबरदस्त अ‍ॅक्शन अन्…; बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
marathi actor subodh bhave
‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे झळकणार ‘या’ संगीतमय चित्रपटात; म्हणाला, “अखेर…”
teen-adkun-sirtaram
‘तीन अडकून सीताराम’चा नेमका अर्थ काय? अभिनेते दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांचा खुलासा

‘जनहित में जारी’ हा एक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात नुसरत एक ‘कंडोम विक्री कार्यकारी’च्या भूमिकेत दिसणार आहे. नुसरतच्या भूमिकेविषयी दिग्दर्शक राज शांडिल्य म्हणाले, “या चित्रपटात नुसरत एका छोट्या शहरातील मुलीची भूमिका साकारणार आहे. ती शिक्षित आणि हुशार मुलगी आहे. ती नोकरीच्या शोधात आहे. त्यानंतर तिला कंडोम तयार करणार्‍या कंपनीत ‘सेल्स अॅंड प्रमोशन कार्यकारी’ म्हणून नोकरी मिळते. मेडिकल स्टोअर पासून दुसऱ्या अनेक ठिकाणी कंडोम विकायला जाताना नुसरत समोर कोणती कोणती संकटं येतात, या विषयी या चित्रपटाची पटकथा आहे.”

आणखी वाचा : या बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेमासाठी केलं धर्म परिवर्तन?

या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत. तर, राज आणि नुसरत दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. या आधी त्यांनी ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता मात्र, करोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण झाले नाही. जर सगळ्यांगोष्टी पूर्णपदावर आल्या तर, ऑगस्टमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. या चित्रपटाचे चित्रीकरण हे भोपाल मध्ये होणार आहे. त्यासाठी नुसरत ही त्यांची बोलीभाषा शिकत असल्याचे राज यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nushrratt bharucha playing the role of a condom sales executive in next comedy film janhit mein jaari dcp

First published on: 20-05-2021 at 15:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×