अभिनेत्री नुसरत जहाँ रूग्णालयात दाखल; आज देणार Good News

अभिनेत्री नुसरत जहाँ लवकरच बाळाला जन्म देणार असून यासाठी त्यांनी डॉक्टरांकडे एक खास विनंती देखील केलीय.

nusrat-jahan-admitted-to-hospital-may-deliver-her-first-baby-on-today

बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आल्या. सुरूवातीला त्या उद्योगपती निखिल जैनसोबतच्या लग्नानंतर विवादामुळे चर्चेत आल्या होत्या. लग्नानंतर अवघ्या वर्षाभरातच दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली आणि यात त्यांनी निखिल जैनसोबतचं लग्नच अमान्य केल्यामुळे बरीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता त्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आल्या आहेत. अभिनेत्री नुसरत जहाँ लवकरच बाळाला जन्म देणार असून त्यांना एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. समोर आलेल्या माहितीनुसार आज त्यांच्या बाळाचा जन्म होऊ शकतो. त्यामुळे नुसरत जहां त्यांच्या बाळाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान त्यांच्या आयुष्यातील या खास क्षणासाठी डॉक्टरांकडे एक खास मागणी केलीय.

अभिनेत्री नुसरत जहाँ सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बाळाला जन्म देणार असं सांगण्यात येत होतं. त्यासाठी नुसरत नॉर्मल चेकअपसाठी रूग्णालयात गेल्या होत्या. पण त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना रूग्णालयात दाखल होण्यासाठी सांगितलं. त्यामुळे लवकर आता त्यांच्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन होणार आहे. सध्या नुसरत जहाँ अभिनेता आणि मॉडेल यश दासगुप्ता सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. निखिल जैनसोबत लग्नाला अमान्य केल्यानंतर यश दासगुप्ता सोबतच्या अफेरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

अभिनेत्री नुसरत जहाँ लवकरच आई बनणार असल्यानं त्यांना हा क्षण आणखी स्पेशल बनवायचाय. यासाठी त्यांनी डॉक्टरांकडे एक विनंती सुद्धा केली. डिलिव्हरीच्यावेळी यश दासगुप्ताला त्यांच्या सोबत राहण्याची परवानगी त्यांनी मागितलीय. बाळाला जन्म देत असताना यश दासगुप्ता त्यांच्यासोबत असावा, अशी त्यांची इच्छा आहे.

आणखी वाचा : पाच कोटी जिंकल्यानंतरही ‘केबीसी ५’ विजेत्याच्या आयुष्यात नरक यातनाच; दारूच्या आहारी गेला होता सुशील कुमार

2019 मध्ये निखिल जैनसोबत लग्नगाठ बांधली

अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी २०१९ मध्ये निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये लग्न केलं होतं. त्यांनी केलेल्या आंतरधर्मीय विवाहामुळे देखील त्यावेळी बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. पण लग्नाच्या वर्षभरातच दोघांमध्ये खटके उडू लागले आणि अखेर त्यांनी हे लग्नच अमान्य असल्याचं सांगितलं. त्यामूळे याची चर्चा संपूर्ण देशभरात रंगली होती. नुसरत जहाँ नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी नकार देत होत्या, असं निखिल जैन याने सांगितलं होतं. ऑगस्ट २०२० पासून त्यांच्या वागण्यात अचानक बदल झाला आणि नोव्हेंबरमध्ये त्या घर सोडून गेल्या असल्याचं देखील निखिल जैनने सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nusrat jahan admitted to hospital may deliver her first baby on 26th august prp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!