अष्टपैलू अभिनेते ओम पुरी यांचं हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीच नाही तर प्रत्येक चित्रपट रसिक हळहळला आहे. भारदस्त आवाज आणि राकट चेहरा असलेल्या ओम पुरी यांनी बॉलीवूडमध्ये आपली छाप पाडलीच पण हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळा ठसा उमटवला होता. परंतु, ओम पुरी यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी सिनेमातून झाली होती.

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे हृदयविकाराने निधन

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

मराठी रंगभूमीवर ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक अजरामर ठरले. परंतु, या चित्रपटाची मात्र तेवढी चर्चा झाली नाही. पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटच्या काही माजी विद्यार्थ्यांनी १९७६ मध्ये एकत्र येऊन ‘युक्त को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ स्थापन करून एका राष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेऊन ‘घाशीराम कोतवाल’ नाटकावर एक अत्यंत अनाकलनीय असंगत असा पूर्ण वेळेचा चित्रपट तयार केला. पटकथा तेंडुलकरांचीच होती. त्यात मोहन आगाशे नाना आणि घाशीरामच्या भूमिकेत ओम पुरी होते. या चित्रपटाला कुणी एक असा दिग्दर्शक नव्हता. पण नंतर चित्रपटातून गाजलेले मणी कौल, सद मिर्झा, के. हरिहरन, कमल स्वरूप असे ३-४ दिग्दर्शकीय भूमिकेत होते. कलाकृती कुणा एकाची नाही तर सर्जनात्मक सहकाराने चित्रपट निर्माण करायचा अशी या ‘युक्त’ चमूची संकल्पना होती. हा चित्रपट बर्लिनला १९७६ साली यूथ फोरममध्येही दाखवला गेला होता. पण त्याची फारशी कोणी तिकडे दाखल नाही घेतली.

ओम पुरी यांच्या जाण्याने कलाक्षेत्रावर शोककळा

‘घाशीराम कोतवाल’ नाटक
विजय तेंडूलकर लिखित पेशवाईच्या शेवटच्या काळावरील ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक ढासळलेली राज्यव्यवस्था कशी रसातळाला येते, राज्य व्यवस्था एका व्यक्तीला मोठे करते आणि एका क्षणात त्याला जमीनदोस्तही करते, यावर भष्य करतं. १९७२ मध्ये ते आले आणि त्यानंतर १९७७ मध्ये इंदिरा गांधींची आणीबाणी आली. त्या काळी बंडखोर नाटक म्हणून ते बरेच वादग्रस्त ठरले. मात्र, या नाटकाला पुणेकरांनी उचलून धरले, तर मुंबईत तीव्र विरोध झाला. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, जपानमध्येही त्याचे प्रयोग झाले.

तू आम्हाला फार लवकर सोडून गेलास- शबाना आझमी