ओम पुरी यांनी नुकतेच स्वेडिश दिग्दर्शक लेसी हॉलस्टॉर्मच्या ‘१०० फूट जर्नी’चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. त्यानंतर, लगेचच त्यांना ब्रिटीश वाहिनीवरील मालिकेत काम करण्याची संधी चालून आली आहे. मात्र, याबाबतची पुष्टी अद्याप झालेली नाही. पण पुरी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, मी हनीफ कुरेशीशी बोललो. तो लवकरच माझ्यासाठी काहीतरी खास लिहण्याची योजना करत आहे.
पाकिस्तानी रॉक बॅन्डचे मलालाच्या समर्थनार्थ गाणे!
याव्यतिरीक्त, तालिबानी हल्ल्याला सामोरी गेलेल्या शूर मलाला युसूफझाई हिच्यावर चित्रपट तयार करण्यात येणार आहे. त्यात ओम पुरी हे पाकिस्तानी जनरल कयानीची भूमिका साकारणार आहेत. ‘गुल मकाई’ असे या चित्रपटाचे नाव असून, लघुपट दिग्दर्शक अमजद खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटाचे शिर्षक हे मलालाच्या ‘गुलमकाई’ या ब्लॉगपासून प्रेरित आहे. १४ डिसेंबरपासून भुज येथे चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, त्यानंतर याचे चित्रीकरण जबलपूर, शिमला, कुलू-मनाली, जैसलमेर आणि मुंबई या ठिकाणी करण्यात येईल.