scorecardresearch

Omg2 : अक्षयचा जटाधारी लूक पाहिलात का? पंकज त्रिपाठीसोबतचा व्हिडीओ व्हायरल

अक्षयचा हा लूक ‘Omg2’ या चित्रपटातील आहे.

Omg2 : अक्षयचा जटाधारी लूक पाहिलात का? पंकज त्रिपाठीसोबतचा व्हिडीओ व्हायरल
अक्षयचा हा लूक 'Omg2' या चित्रपटातील आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असतो. सध्या अक्षयने ‘OMG2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अक्षयने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अक्षय सोबत अभिनेता पंकज त्रिपाठी दिसत आहे. हा व्हिडीओ उज्जैनच्या महाकालचे दर्शन घेण्यासाठी ते गेले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत “जिथे विश्व सुरू होते, जिथे ब्रह्मांड आहे, जिथे आदि आणि अनंतकाळचे स्वामी, उज्जैनला भगवान महाकालचे आशीर्वाद घेण्यासाठी तपस्वींच्या शहरात मी आणि माझा मित्र पंकज त्रिपाठी पोहोचलो आहोत. #OMG2 हे हॅशटॅग” अक्षयने दिले आहे.

आणखी वाचा : “एक आई आपल्या मुलाला…”, मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे अर्जुन झाला ट्रोल

आणखी वाचा : “हिंदू धर्माच्या सणावेळीच ज्ञान का देता….” ; ‘त्या’ पोस्टमुळे रितेश देशमुख झाला ट्रोल

मात्र, या व्हिडीओतील अक्षयच्या जटांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. व्हिडीओच अक्षय पंकज यांच्या खांद्यावर हात टाकून मंदिरातून बाहेर पडताना दिसत आहेत. यात अक्षयचा लूक हा त्याच्या भूमिकेसाठीचा आहे. हा व्हिडीओ चित्रपटाचा पोस्टर शेअर केल्यानंतर समोर आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 16:44 IST

संबंधित बातम्या