जयपूर या ठिकाणी झालेल्या कार अपघातात अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालियाचा मृत्यू झाला. राजस्थानची राजधानी जयपूर या ठिकाणी ३० वर्षीय हर्षिल कालिया तिचं काम संपवून कारने परतत होती. त्यावेळी तिची कार अनियंत्रित झाली आणि ती डिव्हायडरला धडकली. त्यामुळे कार उलटली. या अपघातात हर्षिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण तिला मृत घोषित करण्यात आलं.
अपघाताचा थरार आणि सीसीटीव्ही फुटेज
समोर आलेल्या माहितीनुसार, हर्षिल तिची कार स्वतः चालवत होती. शिप्रा पथ रोडवर अचानक कारचे नियंत्रण सुटले आणि ती वेगाने दुभाजकाला धडकली. धडक इतकी जोरात होती की कार डाव्या बाजूला उलटली. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
स्थानिक नागरिकांची मदतीसाठी धाव
हर्षिलच्या कारचा अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी उलटलेली कार सरळ केली आणि हर्षिलला बाहेर काढले. तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. हर्षिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कोण होती हर्षिल कालिया?
हर्षिल कालिया ही जयपूरमधील एक अभिनेत्री होती. तिने डिस्ने+ हॉटस्टारवरील ‘क्राइम नेक्स्ट डोअर’ या गाजलेल्या वेब सिरीजमध्ये काम केले होते. अभिनयच नाही तर तिने एका न्यूज चॅनेलमध्ये अँकर म्हणूनही आपली ओळख निर्माण केली होती. अनेक लोकप्रिय राजस्थानी म्युझिक व्हिडिओमध्ये तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते. ती मिस दिवा राजस्थान २०२१ ची रनर-अप होती आणि नुकतीच मॉडेलिंग क्षेत्रात मोठी झेप घेत होती. हर्षिलचे वडील पत्रकारितेच्या क्षेत्राशी संबंधित असून एका खासगी वृत्तपत्रात कार्यरत आहेत. एका तरुण आणि हुशार अभिनेत्रीच्या अशा अकाली जाण्याने जयपूरच्या कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अभिनेत्री हर्षिल कालियाचा अपघात कसा झाला? काय घडलं?
हर्षिल कालियाचा मंगळवारी रात्री कार अपघात झाला, हर्षिल कार स्वतः चालवत होती. तिच्या कारवरचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला.
हर्षिल कालियाचा हा अपघात इतका भीषण होता, की कार उलटली. तिथे उपस्थित स्थानिकांनी तिला कारच्या बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं.
हर्षिल कालियाचा अपघात झाल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हर्षिल कालियाच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितलं.
