ओटीटी माध्यमावर विविध आशयाच्या चित्रपट अथवा वेब मालिकांना एकीकडे प्रेक्षकांची पसंती मिळत असली तरी दुसरीकडे मोठय़ा पडद्यावर चरित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उस्तुकता आजही काउयम असल्याचे दिसून येत आहे. मनोरंजनसृष्टीत ठरावीक आशय किंवा विषयांवर आधारित चित्रपटांचा एक काळ असतो. तसा हिंदी चित्रपटसृष्टीत गेली काही वर्ष सातत्याने चरित्रपटांचा प्रवाह टिकून राहिला आहे. २०२३ या वर्षांतही बरेच चरित्रपट प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. कोणत्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट आहे इथपासून ते मुख्य व्यक्तिरेखा साकारणारा कलाकार कोण आहे? भूमिकेसाठी संबंधित कलाकाराने घेतलेली शारीरिक मेहनत, चेहरा-देहबोली यात केलेले बदल आणि खरोखरच त्या कलाकाराने ही भूमिका त्या त्या व्यक्तिमत्त्वानुसार वा किमान साधर्म्य साधण्याइतपत उत्तम साकारली आहे का? असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांची चरित्रपटांविषयीची उत्कंठा वाढवत असतात. यंदा प्रदर्शित होणाऱ्या चरित्रपटांपैकी काही चित्रपटांची प्रेक्षकांकडून मनापासून प्रतीक्षा केली जात आहे.

मैदान

आता प्रदर्शित होणार करता करता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘मैदान’ चित्रपटाची तारीख दहाव्यांदा बदलण्यात आली आहे. भारतीय फुटबॉल संघाची कथा सांगणारा हा चित्रपट भारतीय फुटबॉलचे जनक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. या चरित्रपटात अभिनेता अजय देवगण सय्यद रहीम यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. अमित शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ चित्रपट येत्या २३ जूनला प्रदर्शित होणार होता, मात्र अजूनही चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत साशंक असलेल्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा या चरित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. 

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

मै अटल हूँ

मराठी चित्रपटसृष्टीला ‘बालगंधर्व’ या चरित्रपटाची अनमोल देणगी देणारे मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी याआधीच हिंदीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. मात्र सध्या हिंदीत त्यांची चर्चा आहे ते ‘मै अटल हूँ’ या नव्या चरित्रपटामुळे.. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मै अटल हूँ’ हा चरित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांच्या खांद्यावर असून यात अभिनेते पंकज त्रिपाठी वाजपेयींची व्यक्तिरेखा साकारत आहेत.

इमर्जन्सी

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जीवन मोठय़ा पडद्यावर उलगडणारा चरित्रपट ‘इमर्जन्सी’ या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चरित्रपटात अभिनेत्री कंगना रणावत इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर कंगनाने दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट आहे. १९७५ साली इंदिरा गांधींनी देशात लागू केलेल्या आणीबाणीनंतर देशभरात त्याचे काय राजकीय, सामाजिक पडसाद उमटले हे ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. 

कॅप्सूल गिल

अभिनेता अक्षय कुमारने याआधी एकाहून एक दर्जेदार आशय असलेले चित्रपट केले आहेत. मात्र, गेल्या वर्षभरात त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी थंड प्रतिसाद दिला आहे. अर्थात, चित्रपट चालला नाही म्हणून थांबेल तो अक्षय कुमार कुठला.. तो त्याच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. लवकरच तो ‘कॅप्सूल गिल’ नामक चरित्रपटात दिसणार आहे. १९८९ साली पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील कोळशाच्या खाणीत अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवणाऱ्या जसवंत सिंह गिल यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘कॅप्सूल गिल’ या चित्रपटात अक्षय जसवंत यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टिनू सुरेश देसाई करत आहेत.

चकदा एक्स्प्रेस

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट ‘चकदा एक्स्प्रेस’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेत्री अनुष्का शर्माने झुलन यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. नेटफ्लिक्सवर झळकणाऱ्या या चरित्रपटाच्या निमिताने अनुष्का तब्बल तीन वर्षांनी पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे.

द गुड महाराजा

विकास वर्मा यांचे दिग्दर्शन असलेला ‘द गुड महाराजा’ हा चरित्रपट जामनगर येथील राजा दिग्विजयसिंग रणजीतसिंग जडेजा यांच्या जीवनावर आधारित असून यात दिग्विजयसिंग यांची व्यक्तिरेखा अभिनेते संजय दत्त साकारणार आहेत. हा चित्रपट १० नोव्हेंबर २०२३ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.

सॅम बहादुर

अभिनेता विकी कौशल याची प्रमुख भूमिका असलेला ‘सॅम बहादुर’ हा चित्रपटदेखील वर्षअखेरीस प्रदर्शित होणार आहे. सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चरित्रपटात अभिनेत्री सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या चरित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे.