scorecardresearch

“ज्या चित्रपटात मी धावतो तो…” अभिनेता शाहरुख खानने दिली होती कबुली

नुकतेच ‘पठाण’च्या सेटवरचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत.

“ज्या चित्रपटात मी धावतो तो…” अभिनेता शाहरुख खानने दिली होती कबुली
bollywood actor

बॉलिवूडचा रोमँटिक हिरो म्हणून ज्याच्याकडे बघितले जाते तो म्हणजे शाहरुख खान, आज जगभरात शाहरुखचे चाहते आहेत. त्याच्या वाढदिवसाला त्याचे चाहते शुभेच्छा देण्यासाठी मन्नत बाहेर गर्दी करतात. शाहरुख खानदेखील चाहत्यांना येऊन अभिवादन करतो. टीव्ही मालिकांमधून त्याने आपल्या करियरची सुरवात केली. सुरवातीला त्याने सर्कस, फौजीसारख्या मालिका केल्या. दिवाना चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये दाखल झाला. बॉलीवूडमध्ये त्याला मग एकामागोमाग एक चित्रपट मिळत गेले. बघता बघता तो स्टार बनला. मात्र हाच स्टार एका मुलाखतीत म्हणाला की ‘मी थोडा अंधश्रद्धाळू आहे’.

कोयला या चित्रपटाच्या दरम्यान तो असं म्हणाला होता, की ‘मी थोडा अंधश्रद्धाळू आहे मी ज्या चित्रपटात धावतो तो चित्रपट हिट होतो. ‘डर’ चित्रपटात धावलो तो हिट झाला. ‘करण अर्जुन’ चित्रपटात सलमान मला म्हणाला भाग अर्जुन भाग तो हिट झाला. आता या चित्रपटातदेखील मी धावत आहे’. शाहरुखने आपल्या नेहमीच्या आपल्या स्टाईलमध्ये आपले मत दिले. कोयला चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमरीश पुरी, माधुरी दीक्षित, अशोक सराफ असे मातब्बर कलाकार होते.

अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ प्रश्नावर जॅकी श्रॉफ म्हणाले, “तुमच्यामुळे माझी भाषा…

शाहरुख सध्या जवान, पठाण या चित्रपटांवर काम करत आहे. यासाठी तो मेहनत घेत आहे. झिरो’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. नुकताच तो ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. त्याचा ‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे. मल्टीस्टारर चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. हा चित्रपट हाय-ऑक्टेन अॅक्शन फिल्म असल्याचं म्हटलं जात आहे.

नुकतेच ‘पठाण’च्या सेटवरचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत. लोकं शाहरुखच्या नव्या लूकसाठी प्रचंड उत्सुक आहेत. अशातच नुकतंच शाहरुखने एक पोस्ट करत तोदेखील पठाणची वाट पाहत असल्याचं सांगितलं आहे. शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या