‘१४ वर्षे दोन पाहुणे घराबाहेरच ठेवले आहेत’, अमोल कोल्हेंची पत्नीसाठी खास पोस्ट

अमोल कोल्हेंची ही फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

amol kolhe post, amol kolhe, amol kolhe wife, ashwini kolhe,

अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पत्नी अश्विनी कोल्हे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच पत्नीला लग्नाच्या १४व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

अमोल कोल्हेंनी फेसबुकवर पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘१४ वर्षांच्या वनवासाचं फलित काय असतं ते माहित नाही, पण १४ वर्षांच्या सहवासाचं फलित नक्कीच चांगलं आहे. माणूस म्हणून समृद्ध होणं, संसाराच्या परिघात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणं, परस्परपूरक भूमिका घेणं या प्रत्येक गोष्टीत आणखी सुधारणा होत असताना, दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले आहेत ताटकळत.. १) ‘तू चूक’ आणि २) ‘मीच बरोबर’. कारण तेवढं केलं की सहवासाबरोबरच विरहाच्याही प्रत्येक क्षणाचा सोहळा होतो. समाधानाच्या उंबरठ्याच्या आत सुख नांदतं यावरचा विश्वास दृढ करणाऱ्या सहचारिणीस लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा,’ असे म्हटले आहे.

VIDEO : ‘तडप’चं स्क्रीनिंग अन् ‘हिरो’वरच भडकली काजोल; अहान शेट्टीला म्हणाली, “मूर्ख…” :

अमोल कोल्हे आणि अश्विनी यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. अश्विनी या सुद्धा डॉक्टर आहेत. त्यांना आद्या आणि रुद्र ही दोन मुले आहेत. सोशल मीडियावर ते मुलांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. आद्या ही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत काम करताना दिसली होती. एक यशस्वी अभिनेता ते राजकारणी या त्यांच्या प्रवासात पत्नीचा मोलाचा वाटा आहे. अनेक वेळा त्यांनी पोस्टमध्ये पत्नीचा उल्लेख करत सांगितले आहे. अमोल कोल्हेंच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: On wedding anniversary dr amol kolhe special post for his wife dr ashwini kolhe viral on social media avb

ताज्या बातम्या