कपिल शर्मा करणार होता आत्महत्या, शाहरुख खान आला मदतीला धावून

कपिलने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी सांगितले आहे.

भारतात सर्वात लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता म्हणून कपिल शर्मा ओळखला जातो. त्याने ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’चे सूत्रसंचालन करत अनेकांच्या मनात घर केले आहे. शो मधील कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण एक काळ असा होता की कपिल आत्महत्या करण्याचा विचार करत होता.

नुकताच कपिलने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. करिअरच्या सुरुवातीला त्याला सतत नकार मिळत होता. त्यामुळे त्याने मद्यसेवन करण्यास सुरुवात केली होती. तसेच त्याला नैराश्याचा देखील सामना करावा लागला होता. एक वेळ तर अशी होती की कपिलने आत्महत्या करण्याचा विचार केला होता. पण त्याच वेळी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख कपिलच्या मदतीला धावून आला. त्याला मार्गदर्शन केले.
आणखी वाचा : ‘बबड्या’ आता एका वेगळ्या भूमिकेत येणार प्रेक्षकांच्या भेटीला

करिअरमध्ये सुरुवातीला कपिलला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागत होता. त्याच दरम्यान कपिलने मद्यसेवन करण्यास सुरुवात केली. आत्महत्या करण्याचे विचार कपिलच्या डोक्यात येत होते. त्याचवेळी शाहरुख आणि कपिलची ओळख झाली. शाहरुखने कपिलला समजावले आणि या सर्वातून बाहेर काढले. शाहरुखने मदत केल्यानंतर कपिल शर्माचे आयुष्य पुन्हा रुळावर आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Once kapil sharma reveals he had a thought of suicide but shahrukh khan support him avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या