बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा लाडका मुलगा तैमूर याची लोकप्रियता ही कोणत्या सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही. तैमूरचे लाखो चाहते आहेत. तैमूरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो. त्याची लोकप्रियता पाहता अनेकांनी तैमूरला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी घेऊन येण्याचा सल्ला सैफला दिला होता. हा खुलासा स्वत: सैफने एका मुलाखतीत केला आहे.

२०१८ मध्ये सैफने आर जे सिद्धार्थ कननला एक मुलाखत दिली होती. “मी ज्या ज्या निर्मात्यांसोबत काम केले त्या प्रत्येकाने मला तैमूरला प्रमोशनच्या वेळी घेऊन येण्याचा सल्ला दिला होता. एवढंच नाही तर ‘बाजार’ आणि ‘कालाकांडी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तर भन्नाट कल्पना देखील सुचवल्या होत्या. त्यानंतर तैमूरची लोकप्रियता पाहता मी एकदा करीनाला म्हणालो की जर तैमूरला कोणत्या डायपरची चांगली जाहिरात मिळाली तर आपण विचार करू, त्यावर करीना माझ्यावर संतापली आणि म्हणाली, ‘तू तुझ्या मुलाला विकू शकतं नाही’, असे सैफने त्या मुलाखतीत सांगितले.

आणखी वाचा : ‘…म्हणून मला बाळाला स्तनपान करतानाचा फोटो शेअर करायची गरज वाटत नाही’ : करीना कपूर

आणखी वाचा : ‘बाबा!!! आई आली’, रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा : मीरा कपूरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

तैमूरची लोकप्रियता आणि त्याला ज्या प्रमाणे सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. ते पाहता करीना आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाला सोशल मीडियापासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव ‘जेह’ आहे. तैमूर प्रमाणेच जेहला देखील त्याच्या नावमुळे ट्रोल करण्यात आलं आहे.