‘बंटी और बबली २’

‘फुरसतगंज’मध्ये रेल्वे तिकीट तपासनीस म्हणून काम करत असलेल्या बंटीच्या भूमिके साठी सैफने वजनही वाढवलं आहे.

बॉलीवूडमध्ये लोकप्रिय ठरलेल्या जोड्यांपैकी एक म्हणून अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांची जोडी ओळखली जाते. या दोघांनी ‘हम तुम’ व ‘तारारमपम’ या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. आणि दोन्ही चित्रपट यशस्वी ठरले. आता इतक्या वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा ‘बंटी और बबली २’ या सिक्वलमध्ये एकत्र दिसणार आहे. यशराजची निर्मिती असलेला ‘बंटी और बबली’ हा चित्रपट तिकीटबारीवर खूप गाजला. आता त्याच्या सिक्वलमध्ये मूळ बंटीची म्हणजे अभिषेक बच्चनची जागा सैफने घेतली आहे. पहिल्या चित्रपटात सगळ्यांना चुना लावणारं हे जोडपं आता एका छोट्याशा शहरात स्थिरस्थावर झालं असून बंटी आता तिकीट तपासनीसाची नोकरी करताना दिसणार आहे.

‘फुरसतगंज’मध्ये रेल्वे तिकीट तपासनीस म्हणून काम करत असलेल्या बंटीच्या भूमिके साठी सैफने वजनही वाढवलं आहे. सिक्वलमध्ये बंटीने लोकांची फसवणूक करणं सोडून दिलंय आणि तो बबली ऊर्फ विम्मीसोबत कौटुंबिक जीवन जगतोय, असं वळण कथेला दिलं गेलं आहे. परंतु लहान शहरातील संथ जीवनशैलीचा बंटीच्या शरीर प्रकृतीवरही परिणाम झाला आहे. देशभर चोऱ्या करताना अनुभवलेला थरार आताही अनुभवावासा त्याला वाटतो, मात्र तो पुन्हा चोरी करेल? की नाही… याचं उत्तर या सिक्वलपटात मिळणार आहे. ‘या पात्रासाठी मला खूप वजन वाढवावं लागलं. आणि सध्या लागोपाठ चित्रीकरण करण्यात व्यग्र असल्याने तेवढ्याच वेगाने ते वजन कमीही करावं लागलं’, असं सैफ  म्हणतो. मात्र बंटीच्या भूमिके साठी घ्यावी लागलेली ही मेहनत त्रासदायी न ठरता त्याचा आनंदच झाला असल्याचेही त्याने सांगितले. यातला बंटी जो आहे त्याने पूर्वी अनेकांची फसवणूक के ली असली तरी आता मात्र तो कु टुंबवत्सल माणूस आहे. अर्थात, त्याच्या मनातला चोर अधूनमधून डोकं  वर काढत असल्याने त्याच्या कु टुंबवत्सलतेवर मात करत मुळचा बंटी जागा होणार का हा या चित्रपटाच्या कथेतला भाग मला जास्त रंजक वाटला, असंही त्याने स्पष्ट के लं. ‘बंटी और बबली २’मध्ये सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी व नवोदित अभिनेत्री शर्वरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित झाल्यानंतर १९ नोव्हेंबरला ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार असून याचे दिग्दर्शन वरुण व्ही. शर्मा यांनी के ले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: One of the most popular couples in bollywood actor saif ali khan actress rani mukherjee akp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या