scorecardresearch

VIDEO : ‘अमर फोटो स्टुडिओ’च्या टीमसोबत दिलखुलास गप्पा

‘लोकसत्ता’तर्फे आजवर नानाविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.

VIDEO : ‘अमर फोटो स्टुडिओ’च्या टीमसोबत दिलखुलास गप्पा
कार्यक्रमाला नाटकातील पाचही मुख्य कलाकार, लेखिका आणि निर्माते उपस्थित होते.

‘लोकसत्ता’तर्फे आजवर नानाविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. काळाची पावलं ओळखून संवादाच्या नवीन माध्यमांना ‘लोकसत्ता’ने नेहमीच आपलसं केलं आणि म्हणूनच वाचकांनीही त्याला भरघोस प्रतिसाद दिला. याच नवमाध्यामांची ताकद ओळखून आणि वाचकांपर्यंत पोहोचण्याचे सुलभ साधन म्हणून लोकसत्ता ऑनलाइनतर्फे ‘लोकसत्ता लाईव्ह चॅट’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.  या उपक्रमाद्वारे ‘फेसबुकच्या व्हिडिओ चॅट’मार्फत विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी आणि नामवंतांशी संवाद साधण्याचे नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांचे अनुभव, मतं, विचार जाणून घेण्याची संधी वाचकांना मिळतेय एवढंच नव्हे तर पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या लोकांना भेटण्याची, त्यांना तुमच्या मनातील प्रश्न थेटपणे विचारण्याची संधीही यानिमित्ताने उपलब्ध होत आहे.

या अनोख्या उपक्रमाच्या नव्या अध्यायात ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाच्या युथफुल टीमने हजेरी लावली होती. ‘लोकसत्ता लाईव्ह चॅट’च्या निमित्ताने नव्या पाहुण्यांसह ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अमेय वाघ, सखी गोखले, पूजा ठोंबरे, सुव्रत जोशी आणि सिध्देश पुरकर तुमच्या भेटीला आले होते.  ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाच्या निमित्ताने ही सर्व तरूण मंडळी पुन्हा एकदा एकत्र आली. नाटकाची लेखिका मनस्विनी लता रवींद्र हि देखिल गप्पांमध्ये सहभागी झाली होती. एवढंच नव्हे तर नाटकाचा निर्माता आणि सदाबहार तरूण अभिनेता सुनील बर्वे हादेखिल स्टुडिओमध्ये उपस्थित होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2017 at 10:16 IST

संबंधित बातम्या