सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. करोना काळानंतर २ वर्षांनी लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डयून’ चित्रपटाला सर्वाधिक ६ पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन डेनिस विलेन्यूवे या प्रसिद्ध दिग्दर्शकानं केलं आहे.

‘द अकॅडमी’ या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून या पुरस्कारांची माहिती देण्यात आली आहे. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात ड्यून चित्रपट सर्वाधिक चर्चेत राहिला आणि या चित्रपटानं सर्वाधिक ६ पुरस्कारही जिंकले आहेत. या चित्रपटाला ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी तब्बल १० नामांकनं मिळाली होती. त्यापैकी ६ पुरस्कारांवर आपलं नाव कोरत ‘ड्यून’नं सिक्सर मारला आहे.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

आणखी वाचा- ऐतिहासिक! ‘हा’ कलाकार ठरला सहाय्यक भूमिकेसाठी ऑस्कर जिंकणारा पहिला कर्णबधिर अभिनेता

ड्यून’ चित्रपटाला मिळालेले पुरस्कार

सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन
सर्वोत्कृष्ट साउंड
सर्वोत्कृष्ट विजुअल इफेक्ट
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी

ऑस्कर २०२२ चे सर्वाधिक ६ पुरस्कार जिंकणाऱ्या ड्यून या चित्रपटात टिमोथी चालमत आणि जेसिका फर्ग्यूसन यांच्या मुख्य भूमिका आहेत. दरम्यान यंदाच्या ऑस्करमध्ये भारताच्या ‘रायटिंग विथ फायर’ या माहितीपटालाही नामांकन मिळालं होतं मात्र हा माहितीपट पुरस्कार मिळवण्यात अपयशी ठरला. यंदाचा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार ‘द समर ऑफ सोल’ला मिळाला.