95th Academy Awards 2023 : चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आहे. ऑस्कर २०२३ साठी ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळालं होतं. हा पुरस्कार आरआरआरने आपल्या नावावर केला आहे.

‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून पुरस्कार मिळाला आहे. ऑस्कर मिळवत या गाण्याने इतिहास रचला आहे. भारताला पहिल्यांदाच गाण्यामुळे ऑस्कर मिळाला आहे. ‘नाटू नाटू’ गाण्यासाठी ऑस्कर मिळण्यामागे संगीतकार एम एम कीरावनी यांचा मोठा वाटा आहे.

suspense and thrill janhvi kapoor ulajh movie teaser released
Video: “गद्दारी केल्याचा बदला…”, जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, अभिनेत्री झळकणार एका वेगळ्या भूमिकेत
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”
Loksatta entertainment Murder Mubarak movie released on Netflix channel
अजब व्यक्तिरेखांची गजब जंत्री

हेही वाचा>> Oscars Awards 2023 : ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाला ऑस्कर, ‘या’ श्रेणीत पटकावला पुरस्कार

हेही पाहा>> Oscars Awards 2023 : दीपिका पदुकोणचा ऑस्करसाठी ग्लॅमरस लूक, मानेवरील टॅटूने वेधलं लक्ष

कोण आहेत एम एम कीरावनी?


एम एम कीरावनी तेलुगु चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आहेत. साहाय्यक संगीतकार म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘मनासु ममता’ या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. ‘आरआरआर’ चित्रपटातील नाटू नाटू गाणंही त्यांनीच संगीतबद्ध केलं आहे.

ऑस्कर मिळवण्याआधी किरावनी यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार नावावर केले आहेत. नाटू नाटू’ साठीच त्यांना गोल्डन ग्लोब्सचा अवॉर्डही मिळाला. ‘मगधीरा’ व ‘बाहुबली २’ या चित्रपटातील गाण्यांसाठीही त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.