Oscar Awards 2026 Winners Full List: मनोरंजन विश्वातील सर्वात प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा ९८ वा अकादमी पुरस्कार (Oscars 2026) सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. यंदाचा सोहळा भारतीयांसाठी विशेष ठरला आहे, कारण ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा ऑस्करच्या मंचावर ‘प्रेझेंटर’ म्हणून झळकली. प्रियांकासोबतच रॉबर्ट डाउनी ज्युनियर, अॅन हॅथवे यांसारख्या दिग्गज हॉलिवूड कलाकारांनी मंचावर विजेत्यांची नावे जाहीर करून पुरस्कार प्रदान केले. यंदा कोणत्या चित्रपटांनी ऑस्करच्या शर्यतीत बाजी मारली, सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरले? जाणून घेऊयात.
दरवर्षीप्रमाणे डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन दुसऱ्यांदा प्रसिद्ध कॉमेडियन कोनन ओ’ब्रायन करत आहेत. प्रियांका चोप्राने प्रेझेंटर म्हणून या सोहळ्याला हजेरी लावली, त्यामुळे भारतासाठी हा सोहळा खास ठरला.
यावर्षीच्या शर्यतीत काही चित्रपटांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. Sinners या चित्रपटाला सर्वाधिक १६ नामांकने मिळाली होती, त्याने ४ ऑस्कर जिंकले. तर १३ नामांकनं मिळवणाऱ्या One Battle After Another ने सर्वाधिक सहा ऑस्कर जिंकले.
९८ व्या अकॅडमी अवॉर्ड्सचे अपडेट्स : Oscar 2026 Updates
प्रियांका चोप्रा ऑस्करच्या मंचावर असताना घडलं असं काही की…, अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष, Video Viral
९८ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये वन बॅटल आफ अनादरचा दबदबा
सर्वोत्कृष्ट चित्रपट कॅटेगरीत पॉल थॉमस अँडरसनचा ब्लॅक कॉमेडी अॅक्शन-थ्रिलर 'वन बॅटल आफ अदर'ने बाजी मारली. त्याने सिनर्स, बुगोनिया, एफ१, फ्रँकेन्स्टाईन, हॅमनेट, मार्टी सुप्रीम, द सीक्रेट एजंट, सेंटिमेंटल व्हॅल्यू आणि ट्रेन ड्रीम्स यांना मागे टाकलं. २०२६ च्या ऑस्करमध्ये या चित्रपटाने एकूण सहा ऑस्कर पटकावले.
'One Battle After Another'ला ५, तर 'Sinners'ला ४ पुरस्कार
९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात 'One Battle After Another' या चित्रपटाला एकूण पाच पुरस्कार मिळाले. तर त्यापाठोपाठ चार पुरस्कारांसह 'Sinners' हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे.
'हॅमनेट' (Hamnet) या चित्रपटातील भूमिकेसाठी जेसी बकली हिला 'सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री'चा पुरस्कार देण्यात आला. गेल्या वर्षी 'अनोरा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री मायकी मॅडिसन हिने ऑस्कर प्रदान केला.
मायकल बी. जॉर्डन हा ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
मायकल बी. जॉर्डनला 'सिनर्स'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर देण्यात आला. गेल्या वर्षी 'द ब्रुटलिस्ट'मधील आपल्या अभिनयासाठी हा पुरस्कार जिंकणाऱ्या अभिनेता ॲड्रियन ब्रोडीने मायकलच्या नावाची घोषणा केली.
'One Battle After Another'चा ऑस्करमध्ये दबदबा!
'One Battle After Another' या चित्रपटाचे पॉल थॉमस अँडरसन यांनी 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन' कॅटेगरीत बाजी मारली. या सोहळ्यातील त्यांच्या सिनेमाचा हा पाचवा पुरस्कार आहे. 'The Drama' चे कलाकार, झेंडाया आणि रॉबर्ट पॅटिन्सन यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
'Sentimental Value' ठरला बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म; प्रियांका चोप्राने प्रदान केला पुरस्कार
दिग्दर्शक जोआकिम ट्रायर यांच्या 'Sentimental Value' या चित्रपटाला बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्मचा अकादमी पुरस्कार मिळाला. अभिनेत्री-निर्माती प्रियांका चोप्रा आणि स्पॅनिश अभिनेते हविएर बार्डेम यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
'Sinners'ला तिसरा ऑस्कर
'Sinners' या चित्रपटासाठी ऑटम ड्युरल्ड अर्कापॉ यांनी 'बेस्ट सिनेमॅटोग्राफी'चा ऑस्कर मिळाला. ही या सिनेमाची तिसरी ट्रॉफी आहे. डेमी मूर यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
अँडी जर्गेनसेन यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट एडिटिंगचा ऑस्कर
अँडी जर्गेनसेन यांना वन बॅटल आफ्टर अनादर या त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादनाचा एडिटिंगचा पुरस्कार मिळाला आहे.
F1 ला 'सर्वोत्कृष्ट ध्वनी'चा पुरस्कार
दिग्दर्शक जोसेफ कोसिन्स्की यांच्या 'F1' या चित्रपटाचा हा पहिलाच विजय ठरला असून, या क्रीडा-नाट्यपटाने 'सर्वोत्कृष्ट ध्वनी'साठीचा ॲकॅडमी पुरस्कार पटकावला. या चित्रपटाला एकूण चार नामांकने प्राप्त झाली होती.
'सिनर्स'ला मिळाला दुसरा पुरस्कार
'सिनर्स'मधील लुडविग गोरान्सन यांनी Best Original Score चा पुरस्कार पटकावला. १६ नामांकनं मिळवल्यानंतर, या चित्रपटाचा हा दुसरा पुरस्कार आहे.
गीता गांधभीर यांच्या चित्रपटांचा ऑस्कर हुकला
भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या गीता गांधभीर यांच्याकडून भारताची ऑस्करची आशा पूर्ण झाली नाही. त्यांच्या चित्रपटांना ज्या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं, त्यात त्यांना यश मिळालं नाही. Best Documentary Feature Film या कॅटेगरीत गीता गांधभीर यांच्या 'द परफेक्ट नेबर' या चित्रपटाला मागे टाकत 'मिस्टर नोबडी अगेन्स्ट पुतीन' (Mr Nobody Against Putin) या चित्रपटाने ऑस्कर पटकावला.
'अवतार'चे मोठे यश
दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांच्या 'अवतार: फायर अँड ॲश' या चित्रपटाने 'सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स'साठीचा अकादमी पुरस्कार पटकावला.
फ्रँकेन्स्टाईनला तिसरा पुरस्कार
दिग्दर्शक गिलेर्मो डेल टोरो यांचा फ्रँकेन्स्टाईन चित्रपट ९८ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये पॉल थॉमस अँडरसनच्या 'वन बॅटल आफ्टर अदर' बरोबर सातत्याने पुरस्कार जिंकत आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइनसाठी अकादमी पुरस्कार जिंकला आहे. तमारा डेव्हरेल आणि शेन व्हिएउ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
'Sinners'ला सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेसाठी अकादमी पुरस्कार
'Sinners'ने नुकताच आपला पहिला ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. रायन कूगलरला 'सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा' श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. अभिनेते रॉबर्ट डाउनी जुनियर आणि ख्रिस इव्हान्स यांनी हा पुरस्कार प्रदान केला.
पॉल थॉमस अँडरसनने जिंकला पहिला अकादमी पुरस्कार !
पॉल थॉमस अँडरसनने 'वन बॅटल आफ्टर अदर' या चित्रपटासाठी बेस्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेसाठी अकादमी पुरस्कार जिंकला.
शॉन पेन यांना 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' पुरस्कार जाहीर
दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन यांच्या 'वन बॅटल आफ्टर अनदर' (One Battle After Another) या चित्रपटासाठी अभिनेता शॉन पेन यांनी 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' हा पुरस्कार पटकावला आहे.
मात्र, या सोहळ्याला शॉन पेन स्वतः उपस्थित नव्हते. गेल्या वर्षी 'अ रिअल पेन' (A Real Pain) या चित्रपटासाठी हाच पुरस्कार जिंकणारे अभिनेते कीरन कल्किन यांनी विजेत्याच्या नावाची घोषणा केली आणि पेन यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
दोन चित्रपट ठरले 'सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन फिल्म'चे मानकरी
'सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन फिल्म' या श्रेणीमध्ये दोन चित्रपटांना ऑस्कर देण्यात आला. सॅम ए. डेव्हिस दिग्दर्शित 'द सिंगर्स' आणि नताली मुस्टियाटा व अलेक्झांड्रे सिंग यांनी दिग्दर्शित केलेला 'टू पीपल एक्स्चेंजिंग सलायव्हा' या दोन्ही चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार देण्यात झाले.
कॅसांड्रा कुलुकुंडिस यांनी पटकावला पहिला 'सर्वोत्कृष्ट कास्टिंग' पुरस्कार
९८ व्या ऑस्कर सोहळ्यात Achievement in Casting ही एक नवीन कॅटेगरी सुरू करण्यात आली, ज्यामुळे आता एकूण पुरस्कारांची संख्या २४ झाली आहे. 'वन बॅटल आफ्टर अनदर' या चित्रपटासाठी कॅसांड्रा कुलुकुंडिस यांनी या श्रेणीतील पहिला ऑस्कर जिंकून इतिहास रचला आहे.
'फ्रँकनस्टाईन'ला 'बेस्ट कॉश्च्युम डिझाईन' पुरस्कार
दिग्दर्शक गुइलेर्मो डेल टोरो यांच्या 'फ्रँकनस्टाईन' या चित्रपटासाठी केट हॉली यांनी 'बेस्ट कॉश्च्युम डिझाईन' पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार ऑस्कर-विजेती अभिनेत्री ॲन हॅथवे आणि ॲना विंटूर यांनी प्रदान केला.
९८ व्या ऑस्कर सोहळ्याला प्रियांका चोप्राने पती निक जोनससह लावली हजेरी, पाहा व्हिडीओ
९८ व्या ऑस्कर सोहळ्याला प्रियांका चोप्राने पती निक जोनससह हजेरी लावली.
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर कुणाला?
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर 'द गर्ल हू क्राइड पर्ल्स'ने पटकावला.
केपॉप डेमन हंटर्सने ठरला सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म श्रेणीमध्ये, मॅगी कांग आणि क्रिस अॅपेलहन्स दिग्दर्शित अमेरिकन म्युझिकल अर्बन फॅन्टसी 'केपॉप डेमन हंटर्स' हा चित्रपट विजेता ठरला. अभिनेते विल अर्नेट आणि चॅनिंग टाटम यांनी हा पुरस्कार प्रदान केला. मॅगी कांगने यांनी हा पुरस्कार पुरस्कार कोरिया आणि जगभरातील कोरियन लोकांना समर्पित केला.
होस्ट कोनन ओ'ब्रायन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर साधला निशाणा
९८ वा ॲकॅडमी पुरस्कार वितरण सोहळा सुरू आहे. यावेळी कोनन ओ'ब्रायन यांनी आपल्या मोनोलॉगने हॉलीवूडच्या या सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्याची सुरुवात केली. हा सोहळा एक अब्जाहून अधिक लोक लाइव्ह पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या भाषणादरम्यान, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बाललैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्यातील कथित संबंधांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री'चा ऑस्कर एमी मॅडिगनने पटकावला
'WEAPONS' चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री'चा ऑस्कर एमी मॅडिगनने पटकावला.
रेड कार्पेटवरील खास क्षण
सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन मिळालेले चित्रपट
बुगोनिया
F1
फ्रँकनस्टाइन
हॅमनेट
मार्टी सुप्रीम
वन बॅटल आफ्टर अनादर
द सिक्रेट एजंट
सेंटिमेंटल व्हॅल्यू
सिनर्स
ट्रेन ड्रीम्स

९८ व्या ऑस्कर सोहळ्यात प्रियांका चोप्रा प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली असून तिच्या खास लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
