Oscar 2023 Updates in Marathi : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला. यंदा या पुरस्काराचे ९५ वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी फारच खास ठरला. कारण ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.

कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘RRR’ने इतिहास रचला आहे.

Sangeet Natak Academy Award announced to veteran actor Ashok Saraf for his performance in the field of theatre
नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर
hemangi kavi
“आपल्या भाषेवरचं प्रेम….” हिंदी मालिकेसाठी पुरस्कार मिळताच स्टेजवर हेमांगी कवीच्या तोंडून निघाली मराठी, अन्….
national award name indira gandhi and nargis
‘या’ कारणामुळे सरकारने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून वगळले इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचे नाव
Fali S Nariman
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले भारताचे ज्येष्ठ विधिज्ञ फली एस नरिमन यांचं निधन

पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Live Updates

Oscars Awards 2023 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्करला ओळखले जातो. यंदाचा ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ आता 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

08:56 (IST) 13 Mar 2023
'नाटू नाटू' गाण्याला 'ऑस्कर' मिळाल्यानंतर 'आरआरआर' चित्रपट निर्मात्यांची पहिली प्रतिक्रिया

https://twitter.com/RRRMovie/status/1635114639775399937

08:35 (IST) 13 Mar 2023
यंदाचा ऑस्कर भारतासाठी ठरला फारच खास, दोन पुरस्कारांवर कोरलं नाव

बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ' द एलिफंट व्हिस्परर्स 'ने बाजी मारली आहे.

त्यापाठोपाठ आता 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1635112952037789697

08:22 (IST) 13 Mar 2023
बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट

'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स' या चित्रपटासाठी बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले या श्रेणीत डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1635108787752402945

07:54 (IST) 13 Mar 2023

Oscars Awards 2023 : दीपिका पदुकोणचा ऑस्करसाठी ग्लॅमरस लूक, मानेवरील टॅटूने वेधलं लक्ष

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने हजेरी लावली. या सोहळ्यातील तिचा लूकने लक्ष वेधून घेतलं आहे.

फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा

07:43 (IST) 13 Mar 2023
बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म

बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - द बॉय, द मोल, द फॉक्स आणि द हॉर्स यांना यंदाचा या श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1635097018300502017

07:31 (IST) 13 Mar 2023
बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या श्रेणीत भारताने मारली बाजी

बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारतातून नामांकन मिळालेल्या ' द एलिफंट व्हिस्परर्स'ने बाजी मारली आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1635096271655665664

07:28 (IST) 13 Mar 2023
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट

'ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट'ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. अर्जेंटीना 1985, क्लोज, ईओ आणि द क्वाइट गर्ल हे चित्रपटही या पुरस्काराच्या शर्यतीत होते.

https://twitter.com/TheAcademy/status/1635094358285512705

07:13 (IST) 13 Mar 2023
...अशाप्रकारे दरवर्षी केली जाते ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात

दरवर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात एका खास पद्धतीने केली जाते. नुकतंच याचा व्हिडीओ समोर आला आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1635093104796774401

07:08 (IST) 13 Mar 2023
दीपिका पदुकोणकडून 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याचे कौतुक

बॉलिवूडसह हॉलिवूड चित्रपटात आपले नाव गाजवणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर दाखल झाली आहे. यावेळी तिने आरआरआर चित्रपटाची माहिती दिली. त्याबरोबर तिने 'नाटू नाटू' गाण्याचे कौतुकही केले

07:06 (IST) 13 Mar 2023
सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : ब्लॅक पँथर

सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार 'वाकांडा फॉरएव्हर'साठी रुथ कार्टरला मिळाला.

https://twitter.com/TheAcademy/status/1635090608158306304

07:01 (IST) 13 Mar 2023
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल - द वेल

सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइलसाठी देण्यात येणारा ऑस्कर 'द वेल'ला मिळाला आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1635087908171550721

06:55 (IST) 13 Mar 2023
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू' गाण्याची जबरदस्त क्रेझ

९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या सुरुवातीला 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. या पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

https://twitter.com/Loy_talk/status/1635073066748477440

06:47 (IST) 13 Mar 2023
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - जेम्स फ्रेंड

जेम्स फ्रेंडला त्याच्या 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' चित्रपटातील अतुलनीय कामासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1635084820417216512

06:39 (IST) 13 Mar 2023
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म

सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म या ऑस्कर श्रेणीत 'आयरिश गुडबाय' या शॉर्ट फिल्मला पुरस्कार मिळाला आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1635082099270238209

06:30 (IST) 13 Mar 2023
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अभिनेत्री जेमी ली कर्टिस

अभिनेत्री जेमी ली कर्टिस यंदाचा ९५ व्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 'Everything Everywhere All at Once' या चित्रपटातील अभिनयासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1635077623528423425

06:27 (IST) 13 Mar 2023
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : के हुई क्वान

अभिनेता के हुई क्वानला यंदाचा ९५ व्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 'Everything Everywhere All at Once' या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1635075956208697344

06:18 (IST) 13 Mar 2023
Oscar Awards 2023 Live : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील पहिला पुरस्कार जाहीर

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील पहिला पुरस्कार जाहीर

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - पिनोकियो (Pinocchio)

https://twitter.com/TheAcademy/status/1635073108582481920

06:09 (IST) 13 Mar 2023
यंदाच्या ऑस्करमध्ये दीपिका पदुकोण खास भूमिकेत झळकणार
  • यंदाच्या ऑस्कर प्रेझेंटर्सनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचा समावेश आहे.
  • पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्रीला हा मान मिळाला आहे.
  • एमिली ब्लंट, सॅम्युअल एल जॅक्सन, ड्वेन जॉन्सन, मायकेल बी जॉर्डन, जेनेल मोने, झो सलडाना, जेनिफर कोनेली, रिझ अहमद आणि मेलिसा मॅककार्थी यांच्यासारख्या कलाकारांबरोबर ती प्रेझेंटर म्हणून दिसणार आहे.
  • 06:08 (IST) 13 Mar 2023
    ९५ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत
  • यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास
  • ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन
  • गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन
  • यंदा हे गाणं भारताला ऑस्कर मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
  • 06:06 (IST) 13 Mar 2023
    ‘अकादमी पुरस्कार’ अशीही खास ओळख
  • ऑस्कर पुरस्कारला ‘अकादमी पुरस्कार’ या नावानेही ओळखले जाते.
  • चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
  • अमेरिकेतील ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो.
  • १९२७ मध्ये स्थापन झालेल्या या अकादमीचे उद्दिष्ट हे मोशन पिक्चर्सच्या कला आणि विज्ञानांची प्रगती करणे असा आहे.
  • 06:06 (IST) 13 Mar 2023
    Oscar Awards 2023 Live : ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची खास वैशिष्ट्ये
  • कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार
  • चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान
  • सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरव
  • Oscars Awards 2023 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्करला ओळखले जातो. यंदाचा ऑस्कर हा भारतीयांसाठी फारच खास ठरला आहे. यंदा भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ आता 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.