|| गायत्री हसबनीस

‘‘रुपेरी पडदा, छोटा पडदा आणि ओटीटी यात एक कलाकार म्हणून मला काहीच वेगळं वाटत नाही. कलाकृतीतून काय आणि कोणत्या पद्धतीने गोष्ट  निर्माते – दिग्दर्शकांना दाखवायची असते ते तालमीच्या दरम्यान कलाकारांना व्यवस्थित समजावून देण्यात येते. आता ही प्रक्रिया ना ओटीटीत वेगळी आहे ना रुपेरी पडद्यावर. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून मला या दोन माध्यमांमध्ये काहीही फरक आत्तापर्यंत जाणवलेला नाही,’’ असे अश्विनी काळसेकर यांनी स्पष्ट केले. फक्त आता चित्रपटांप्रमाणेच ओटीटीचीही तेवढीच जोरदार प्रसिद्धी होते आहे, हे मात्र त्यांनी आवर्जून नमूद केले.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Madhuri Dixit cried ranjeet scene
विनयभंगाच्या सीनआधी खूप रडली होती माधुरी दीक्षित, काम करण्यास दिलेला नकार; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आठवण
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘‘एक कलाकार म्हणून माझे दिग्दर्शक मला जे काम सांगतील ते योग्यरीत्या पूर्ण करणे हे माझे योगदान ओटीटीसाठीही तेवढेच महत्त्वपूर्ण आहे, कारण मी ओटीटीवर काम करते आहे म्हणून ‘अमुक’ प्रकारचा अभिनय, चित्रपट करते आहे म्हणून ‘तमुक’ प्रकारचा अभिनय आणि दूरचित्रवाणी म्हणून ‘कमी दर्जाचा’ अभिनय करते असे काही होत नाही. अभिनेता किंवा अभिनेत्रीसाठी फक्त अभिनयच सर्वतोपरी महत्त्वाचा असतो. कलाकृतीतून हास्यविनोद साधायचा असेल आणि त्यातही शाब्दिक किंवा प्रासंगिक विनोद असेल तर कशा प्रकारे तयारी करावी लागेल यासाठी ज्या प्रकारे चित्रपट दिग्दर्शकाकडून सूचना दिल्या जातात तशाच सूचना ओटीटीवरही दिल्या जातात, त्यामुळे पद्धतीत काहीच फरक नाही,’’ असेही त्या पुढे म्हणाल्या.

खलनायिका आणि विनोदी नायिका अशा व्यक्तिरेखा साकारत अश्विनी यांनी आपला एक वेगळा बाज निर्माण केला. गंभीर भूमिकाही त्यांनी यशस्वीरीत्या साकारल्या आहेत. तेव्हा ओटीटीवर आल्यावरही आपण काही वेगळं करतोय असा तोरा त्या मिरवत नाहीत, हे त्या प्रामाणिकपणे कबूल करतात. ‘‘दिग्दर्शकासोबतचा अनुभव येथे दर वेळी वेगळा असू शकतो; पण माध्यमं वेगळी आहेत म्हणून अनुभव वेगळा ठरेल असे मला वाटले नाही. ओटीटीवर आल्यावर लेखक-दिग्दर्शक मार्गदर्शन करतातच, तेव्हा कलाकारांनी बाकी कसला विचार न करता जास्त त्यांच्या व्यक्तिरेखांवर काम केले पाहिजे,’’ असा सल्लाही त्या देतात.

नव्या वेबमालिकेचा नायक रुद्राच्या निष्ठावंतांपैकी एक अशा दीपा हांडा नावाच्या महिला पोलीस आयुक्ताची भूमिका अश्विनी यांनी निभावली आहे. गुन्ह्याचा तपास करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेतील सहकाऱ्यांचे नेतृत्व जरी रुद्रा करत असला तरी संकटकाळी रुद्रासकट सर्वाना धीर देणाऱ्याचे काम दीपा करताना दिसतात, अशी माहिती त्यांनी आपल्या भूमिकेविषयी बोलताना दिली. ‘रुद्रा’ या वेबमालिकेच्या निमित्ताने सहकलाकारांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, असे सांगत त्यांनी आपल्या सहकलाकारांचेही कौतुक केले. एरव्ही हिंदी चित्रपटसृष्टीत एकमेकांची स्तुती कोण बरं करत असेल? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो, मात्र आपण कायम आपल्या सहकलाकारांकडून सतत काही तरी चांगलं शोधत राहतो आणि नव्या पिढीकडूनही तेवढय़ाच ऊर्जेने नव्या गोष्टी शिकतो, असे अश्विनी यांनी सांगितले. ‘‘रुद्राच्या निमित्ताने अजय देवगण आणि ईशा देओल यांचे ओटीटीवर पदार्पण झाले आहे. मी स्वत: एक कथक नृत्यगंना असल्याने मी हेमामालिनी यांच्यासह नृत्याचे सादरीकरण केले आहे. तेव्हा ईशाला ती लहान असल्यापासून मी ओळखते आहे. मला सहकलाकार म्हणून तिच्यातील कामाप्रति असलेली आवड या वेळी खूप महत्त्वाची वाटते. आजकाल अनेक नव्या पिढीतील स्त्री कलाकार या घरसंसार सांभाळून नव्या जिद्दीने आपली कामाची आवड जोपासतात आणि कुणाचाही विचार न करता नव्याने त्या कामासाठी प्रचंड श्रम घेतात. हे गुण शिकण्यासारखे आहेत,’’ असे त्यांनी सांगितले. 

ही वेबमालिका आपल्यासाठी एक विद्यापीठ होते, अशा भाषेत त्यांनी दिग्दर्शक राजेश मापूस्कर यांचेही कौतुक केले. ‘‘रुद्रासाठी भरपूर प्रमाणात वाचन, व्यक्तिचित्रणाचा अभ्यास, त्यासाठी कलाकारांना दिलेला वेळ, संवादाची उजळणी, व्यक्तिरेखा खोलात अभ्यासता यावी म्हणून सेटवर जाऊन कलाकारांना शिकवलेल्या बारीकसारीक सूचना या सर्व गोष्टींमुळे वेबमालिकेतून काम करताना एक कलाकार म्हणून जितक्या गोष्टी शिकता आल्या त्या मी शिकले,’’ अशी माहिती त्यांनी दिली. इंडस्ट्रीत इतक्या समृद्धतेने फार कमी वेळा फार कमी लोकांकडून शिकायला मिळते, असेही त्यांनी सांगितले.

दूरचित्रवाणीची ताकद जेव्हा एकता कपूरच्या ‘क’च्या बाराखडीतील मालिकांना उच्चपदावर नेत होती तेव्हा स्मृती इराणी, साक्षी तलवार यांच्याबरोबरीने अश्विनी काळसेकर हे नाव प्रेक्षकांच्या परिचयाचे झाले. अश्विनी यांचा चेहरा बॉलीवूडच्या ‘गोलमाल’, ‘ऑल द बेस्ट’सारख्या विनोदी चित्रपटांतील भूमिकांमुळे घराघरांत पोहोचला, पण तत्पूर्वी त्या दूरचित्रवाणीवरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकल्या होत्या. त्या वेळी वेबमालिकांचे तंत्र अवगत नसतानादेखील त्यांनी त्यांच्या अभिनयातून आपली प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशी गाजवली. नाटकांपासून सुरुवात करत मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटांतून त्या लोकप्रिय ठरल्या आणि आज इंडस्ट्रीतील सर्वात अनुभवी कलाकार म्हणून त्या गणल्या जातात. ‘रुद्रा’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेबमालिकेत त्यांनी महिला पोलीस आयुक्ताची भूमिका वठवली आहे. ओटीटीमध्ये काम करतानाचा फरक आणि नव्याने अनुभवायला मिळणाऱ्या कथा याबद्दल अश्विनी यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. 

राजा माणूस..

‘गोलमाल’सारख्या चित्रपटांमध्ये जेव्हा अजय देवगण ‘गोपाल’ या भूमिकेतून सगळय़ांना उल्लू बनवतो आणि एकच हशा पिकतो तेव्हा मात्र त्यांच्या भोवताली असलेल्या अनेक विनोदवीरांपैकी एक अश्विनी काळसेकर असायच्या. जवळपास सर्वच ‘गोलमाल’पटांमध्ये अजय देवगण यांच्यासमवेत अश्विनी यांनी काम केले आहे. त्यामुळे अजयबरोबर काम करण्याचा भरपूर अनुभव गाठीशी जमा झाला आहे, असे त्यांनी सांगितले. मी सतत सेटवर अजयला पाहत आले आहे. चित्रपट, काम कितीही नवीन असो, पण कलाकारातील काही एक गोष्टी बदलत नाहीत. त्याप्रमाणे अजयची मेहनती वृत्ती आजतागायत कमी झालेली नाही, असे त्या सांगतात. मी प्रेमाने अजयला ‘राजा माणूस’ म्हणून संबोधते, कारण त्याचे वैशिष्टय़ असे की, कलाकार म्हणून कितीही वलय त्याच्याभोवती असले तरी त्याचे दडपण तो इतरांना कधीच जाणवू देत नाही. सेटवर सगळय़ांशी हसूनखेळून काम करतो. अत्यंत मेहनती, दिलदार आणि एक सहकलाकार म्हणून अजय उत्तम अभिनेता असल्याची पावतीही त्यांनी जोडली,