scorecardresearch

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ अखेर ओटीटीवर, इथे पाहता येणार चित्रपट

आमिर खानचा बहुचर्चित चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ अखेर ओटीटीवर, इथे पाहता येणार चित्रपट
मोठ्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करू शकला नाही.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतर बराच गाजला. या चित्रपटाला सातत्याने बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करू शकला नाही. त्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला असून प्रेक्षकांना आता घरबसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे.

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट दसऱ्याच्या रात्री म्हणजेच ६ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सने अचानक हा चित्रपट प्रदर्शित करत प्रेक्षकांना सरप्राइज दिलं. नागा चैतन्य, करीना कपूर, मोना सिंग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ६ महिन्यांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार अशी चर्चा होती मात्र अलिकडेच २० ऑक्टोबरला चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण निर्मात्यांनी अचानक ६ ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित करत प्रेक्षकांना सरप्राइज दिलं.

आणखी वाचा-आमिर खानला रिमेकचा आधार, ‘लाल सिंग चड्ढा’नंतर आता ‘या’ परदेशी चित्रपटाचे बनवणार बॉलिवूड व्हर्जन

नेटफ्लिक्सने याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘लाल सिंग चड्ढा’चं पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं, “पॉपकॉर्न आणि गोलगप्पे आता तयार करा, कारण ‘लाल सिंग चड्ढा’ आता प्रदर्शित होत आहे.” दरम्यान आमिर खानचा हा चित्रपट काहींनी बॉयकॉटमुळे तर काहींनी इतर काही कारणांनी अद्याप पाहिलेला नाही. त्यामुळे आता हा चित्रपट सर्वांना ओटीटीवर पाहता येणार आहे.

दरम्यान ‘लाल सिंग चड्ढा’ला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं होतं. आमिर खानने काही वर्षांपूर्वी केलेल्या काही वक्तव्यांचा आधार घेत या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात आली होती. ज्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला. हा चित्रपट १०० कोटींच्या आसपासही पोहोचू शकला नव्हता. ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ला परदेशात मात्र चांगला प्रतिसाद मिळाला होता.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या