scorecardresearch

५९ मृत्यू, १०० हुन अधिक जखमी; दिल्लीतील ‘या’ सत्यघटनेवर आधारित वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या ट्रेलरमध्ये अनुपम खेर, आशिष विद्यार्थी, राजेश तैलंग, रत्ना शाह पाठक शाह अशा दिग्गज कलाकारांची झलक पाहायला मिळते.

५९ मृत्यू, १०० हुन अधिक जखमी; दिल्लीतील ‘या’ सत्यघटनेवर आधारित वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

१९९७ साली दक्षिण दिल्लीमधील ‘उपहार’ चित्रपटगृहाला लागलेल्या भीषण आगीत ५९ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेवर आधारित ‘ट्रायल बाय फायर’ नावाची वेबसीरिज येत्या १३ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यात अभय देओल आणि मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडे मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर्जेदार वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ट्रायल बाय फायर या वेबसीरिजचा पहिली झलक समोर आली आहे. वेबसीरिजच्या सुरवातीलाच एक सुखी चौकोनी कुटुंब दाखवण्यात आले आहे. या कुटुंबातील मुलं एकेदिवशी ‘उपहार’ चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी जातात आणि तिथे आग लागते. साहजिकच त्यांचे आई वडील अभय देओल, राजश्री देशपांडे त्या दोघांच्या शोध घेण्यास सुरवात करतात. चित्रपटगृहात लागलेली आग नेमकी कशी लागली? यामागे कोणाचा हात आहे? याचे पुरावे गोळा करण्यासाठी आई वडील जीवाचे रान करतात. या ट्रेलरमध्ये अनुपम खेर, आशिष विद्यार्थी, राजेश तैलंग, रत्ना शाह पाठक शाह अशा दिग्गज कलाकारांची झलक पाहायला मिळते.

विश्लेषण : बॉलिवूडच नाही, हॉलिवुडमध्येही घराणेशाहीवरून वाद; ‘नेपो बेबी’ म्हणत स्टार कीड्स होतायत ट्रोल! वाचा नेमकं घडतंय काय?

अभय देओलने साकारलेली भूमिका शेखर कृष्णमूर्ती यांच्यावर बेतलेली आहे. शेखर कृष्णमूर्ती आणि त्यांच्या पत्नीने तब्बल २४ वर्ष न्यायासाठी लढा दिलायादरम्यान दोघांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले. न्यायासाठी किती अडचणी आल्या. हे या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे.

नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती यांच्या “ट्रायल बाय फायर: द ट्रॅजिक टेल ऑफ द उपहार फायर ट्रॅजेडी” या पुस्तकावर आधारित ही वेबसीरिज आहे. या वेबसीरिजमधून अभय देओल पहिल्यांदाच एक वेगळी भूमिका साकारताना दिसत आहे. त्यामुळे त्याचे चाहतेदेखील वेबसीरिज पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 12:06 IST

संबंधित बातम्या