actor ali fazal completed shooting of mirzapur season 3 shared video with team spg 93 | 'मिर्झापूर'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार सीजन ३; अभिनेत्याने दिले संकेत | Loksatta

‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार सीजन ३; अभिनेत्याने दिले संकेत

याआधी रसिक दुग्गल अभिनेत्रीनीने पोस्ट शेअर करत सीजन ३ बद्दल माहिती दिली होती

‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच येणार सीजन ३; अभिनेत्याने दिले संकेत
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ‘मिर्झापूर’ ही वेब सीरिज खूप गाजली. उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर या शहरातली ही गोष्ट आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी यांनी कालीन भैय्या हे मध्यवर्ती पात्र साकारले आहे. याच वेब सीरिजमधील अभिनेता अलि फजलने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. नुकतेच या वेब सीरिजचे चित्रीकरण संपले आहे.

‘मिर्झापूर’ची मोठी फॅन फॉलोईंग आहे. अली फजलने संपूर्ण टीमबरोबर चित्रीकरण संपल्यानंतरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने व्हिडीओला कॅप्शनदेखील दिला आहे की माझ्या सर्वात प्रिय आणि सर्वोत्कृष्ट टीमला मिर्झापूरच्या जगातील सर्व प्रेम आणि मेहनतीबद्दल धन्यवाद. सीजन ३चा प्रवास हा मागील दोन पेक्षा वेगळा होता. यातील अभिनेत्री श्वेता त्रिपाठीनेदेखील व्हिडीओ शेअर केला होता.

अण्णा नाईक पुन्हा एकदा झळकणार खलनायकाच्या भूमिकेत; पोस्टर आले समोर

या वेबसीरिजचे लाखो चाहते जरी असले तरी या तिसऱ्या सीजनवर बंदी घालण्याची एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तिसऱ्या सीझनला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. एवढेच नाही तर न्यायालयाने याचिकाकर्त्याला अधिक चांगली याचिका दाखल करण्यास सांगितले होते.

अली फझल, दिव्येंदु शर्मा, रसिका दुगल, श्वेता त्रिपाठी अशा अनेक तगड्या कलाकारांनी या सीरिजमध्ये काम केले आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेने या सीरिजची निर्मिती केली आहे. हा सीजन पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 20:32 IST
Next Story
आधी स्वतःबद्दल भरभरून बोलली, नंतर ढसाढसा रडली, मलायकाबरोबर नेमकं काय घडलं?