प्रजासत्ताक दिनी अमृता खानविलकरची मोठी घोषणा, 'या' धावपटूच्या बायोपिकमध्ये झळकणार | actress Amruta Khanvilkar play Lalita Babar Biopic lead role big announcement nrp 97 | Loksatta

प्रजासत्ताक दिनी अमृता खानविलकरची मोठी घोषणा, ‘या’ धावपटूच्या बायोपिकमध्ये झळकणार

“तिच्या स्वप्नांचा प्रवास…” प्रजासत्ताक दिनी अमृता खानविलकरची मोठी घोषणा

amruta khanvilkar lalita babar biopic
अमृता खानविलकर ललिता बाबर

मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. उत्तम अभिनय, कमालीचा डान्स आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून अमृता खानविलकर ही चंद्रमुखी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता लवकरच अमृता खानविलकर ही एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता खानविलकर हिने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मोठी घोषणा केली आहे.

प्रसिध्द धावपटू आणि माण तालुक्यातील मोही गावची सुकन्या ललिता बाबर यांच्या जीवनावर लवकरच एक वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे. यात ललिता बाबर यांच्या भूमिकेत अमृता खानविलकर झळकणार आहे. अमृताने स्वत: इन्स्टाग्रामवर याचे पहिले पोस्टर शेअर करत माहिती दिली आहे.
आणखी वाचा : “एखाद्या स्त्रीने…” लावणी कलाकारांना ट्रोल करणाऱ्यांना अमृता खानविलकरचे सडेतोड उत्तर

अमृता खानविलकरची पोस्ट

नमस्कार
प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा ह्या खास दिवशी हि खास अन्नऊन्समेंट
ललिता शिवाजी बाबर
चंद्रमुखीची कात टाकून आता हि नवी कात ओढण्याची वेळ
नव्या वर्षाचं नवं स्वप्नं …. नवं धाडस … नवी परीक्षा
एक अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणे, ज्यांनी आपल्या राष्ट्राचेच नाही तर देशाचे हि नाव जागतिक स्तरावर नेले आहे. याहून सुखावह काही असूच शकत नाही.
हे शिवधनुष्य मी एक अभिनेत्री म्हणून तर उचलं आहेच पण ह्या वेळीस जबाबदारी मोठी आहे
तुमची साथ तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असुद्या
जय हिंद जय महाराष्ट्र

‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘एंडेमोल शाइन’ अभिमानाने सादर करत आहेत, तिच्या स्वप्नांचा धावता प्रवास… अमृता अजित खानविलकर In & As ‘ललिता शिवाजी बाबर’ असे अमृता खानविलकरने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : उर्मिला कोठारे लवकरच घेणार समीर वानखेडेंची भेट, कारण…

दरम्यान अमृता खानविलकरने चंद्रमुखी या चित्रपटात चंद्रा ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. मराठी सिनेसृष्टीप्रमाणे बॉलिवूडमध्येही तिच्या नावाची चर्चा असते. अमृताने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 11:51 IST
Next Story
उर्मिला कोठारे लवकरच घेणार समीर वानखेडेंची भेट, कारण…