"तो माझ्या चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर..." 'गंदी बात'फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीची 'ती' पोस्ट चर्चेत | actress flora saini falls in love again after abusive relationship shares post on instagram | Loksatta

“तो माझ्या चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर…” ‘गंदी बात’फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या धक्कादायक घटनेबद्दल खुलासा करताना फ्लोराने आणखी एक चांगली बातमी दिली आहे

flora saini
फोटो : सोशल मीडिया

‘गंदी बात’फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीची सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. ‘मीटू मुव्हमेंट’दरम्यान फ्लोराने तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा खुलासा केला होता. आता पुन्हा त्याचबाबत टाकलेल्या एका व्हिडिओमुळे फ्लोरा पुन्हा चर्चेत आली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने तिच्यावर झालेल्या शारीरिक शोषणासंदर्भात भाष्य केलं आहे.

या व्हिडिओमध्ये फ्लोराने तिची गोष्ट मांडली आहे. वयाच्या २० व्या वर्षी फ्लोरा चांगलीच यशस्वी झाली होती. तिने तब्बल १० चित्रपटात काम केलं होतं आणि मॉडेल म्हणून सुरू केलेलं करिअरसुद्धा चांगलंच रुळावर आलं होतं. यादरम्यान ती एका निर्मात्याच्या प्रेमात पडली. कालांतराने गोष्टी बदलल्या, त्या निर्मात्याने फ्लोराला मारहाण सुरू केली. तो तिच्या चेहऱ्यावर आणि प्रायव्हेट पार्ट्सवर मारहाण करायचा. त्याने फ्लोराचा फोन घेऊन तिचं कामदेखील बंद केलं होतं.

आणखी वाचा : हाताला सलाईन, चेहऱ्यावर थकवा; इलियाना डिक्रूझ रुग्णालयात दाखल

तब्बल १४ वर्षं त्याने फ्लोराचा इतरांशी असलेला संपर्क तोडला होता. एकदा असंच त्याने तिला पोटावर मारहाण केली, त्यानंतर मात्र फ्लोराने तिथून कसाबसा पळ काढला आणि ती तिच्या आई वडिलांबरोबर राहू लागली. यातून बाहेर पडायला फ्लोराला बरेच महीने लागले. पुढे याबद्दल फ्लोरा म्हणाली, “मी यातून बाहेर आले, मला वेळ लागला पण मी आज खुश आहे. माझा भूतकाळ कसाही असला तरी आता माझा वर्तमान आणि भविष्यकाळ खूप उत्तम आहे.”

आपल्या आयुष्यातील घडलेल्या या धक्कादायक घटनेबद्दल खुलासा करताना फ्लोराने आणखी एक चांगली बातमी दिली आहे. फ्लोरा आता पुन्हा प्रेमात पडली आहे. या सोशल मीडिया पोस्टमध्येच तिने या गोष्टीचाही खुलासा केला आहे. फ्लोरा लिहिते की, “तब्बल १४ महीने मी एका अपमानास्पद नात्याचा हिस्सा होते, आज मी पुन्हा एकदा प्रेमात पडले आहे, आणि यासाठी मी खूप आनंदी आहे.” फ्लोराने ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ आणि ‘आर्या’सारख्या दमदार वेबसीरिजमध्येसुद्धा काम केलं आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 19:36 IST
Next Story
शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘पठाण’ आता ओटीटीवरही होणार प्रदर्शित, कुठे पाहता येणार चित्रपट?