scorecardresearch

लेदर जॅकेट, डोळ्यावर गॉगल; समांथा प्रभूचा ‘सिटाडेल’मधला डॅशिंग लूक पाहिलात का?

समांथा रुथ प्रभू अभिनेता वरुण धवन बरोबर स्क्रिन शेअर करणार आहे

samnatha actress
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू यांच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरिजची चर्चा सुरु आहे. मध्यन्तरी तब्येतीमुळे तिने या प्रोजेक्टला नकार दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण समांथा अजूनही या वेबसीरिजचा एक भाग आहे. अमेझॉन प्राईमने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

दक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने जगभरातल्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. दक्षिणात्य चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका केल्यानंतर ती आता ‘सिटाडेल’ या हिंदी सिरीजमध्ये दिसणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी राज आणि डीके हे या वेबसीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. वेबसीरिजच्या प्रोडक्शनला मुंबईत सुरवात झाली आहे. यानंतर उत्तर भारतात आणि नंतर सर्बिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात चित्रीकरण होणार आहे.

Budget 2023 : देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विवेक अग्निहोत्रींची पहिली प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले…

अमेझॉन प्राईमने तिच्या लूकची पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने लेदर जॅकेट, डोळ्यावर गॉगल आणि जीन्स अशा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन दिला आहे मिशन सुरु झालं आहे. आम्ही ‘सिटाडेलच्या भारतीय व्हर्जनसाठी तयार आहोत. समांथाने याआधीदेखील राज आणि डीके यांच्या ‘फॅमिली मॅन’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

या वेबसीरिजमध्ये तिच्या लूकची झलक पाहायला मिळाली आहे मात्र अदयाप ती कोणत्या भूमिकेत दिसणार आहे याची माहिती समोर आलेली नाही. समांथा लवकरच ‘शाकुंतल’ या ऐतिहासिक तेलगू चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 16:24 IST