"आम्हा दोघांचे..." संजय जाधवबरोबरच्या नात्याबद्दल तेजस्विनीचं स्पष्ट वक्तव्य | Actress Tejaswini Pandit talk about secret of relation with sanjay jadhav in interview nrp 97 | Loksatta

“आम्हा दोघांचे…” संजय जाधवबरोबरच्या नात्याबद्दल तेजस्विनीचं स्पष्ट वक्तव्य

नुकतंच तेजस्विनीने तिच्या आणि संजय जाधव यांच्या नात्याबद्दल भाष्य केले आहे.

tejaswini pandit, sanjay jadhav
तेजस्विनी पंडित संजय जाधव

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून ती बांबू या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्मिती तिने केली आहे. तेजस्विनी पंडित ही कायमच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकतंच तेजस्विनीने तिच्या आणि संजय जाधव यांच्या नात्याबद्दल भाष्य केले आहे.

तेजस्विनी पंडित सध्या निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी तिची निर्मिती असलेली ‘अथांग’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. त्यानंतर तिचा बांबू हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नुकतंच तेजस्विनीने प्लॅनेट मराठीवरील ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान बोलताना तिने तिच्या आणि संजय जाधव यांच्यातील नात्याविषयी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “नागराज मंजुळे आकाशला…” मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीबद्दल तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली

यावेळी तेजस्विनीला तुझ्याबद्दल पसरवण्यात आलेली सर्वोत्कृष्ट अफवा आणि वाईट अफवा कोणती होती, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली, ‘माझं आणि संजय जाधवचं अफेअर आहे. हे आतापर्यंत माझ्याबद्दल पसरवण्यात आलेली सर्वात वाईट अफवा होती.

“कारण संजय जाधव माझा दादा आहे. मी त्याला दादा म्हणते. आम्हा दोघांचे नाते फार घट्ट आहे. कारण दादा मला त्याची मुलगी द्वितीसारखं मानतो. त्याप्रमाणेच वागणूक देतो. त्यावेळी आमच्या दोघांचं अफेअर आहे हे पसरवणं ही सर्वात वाईट अफवा होती. ते फार चुकीचं होतं”, असे तेजस्विनीने स्पष्टपणे सांगितले.

आणखी वाचा : “शिरीन ही भूमिका माझी होती, पण सई ताम्हणकरने…” तेजस्विनी पंडितचा ‘दुनियादारी’बद्दल मोठा गौप्यस्फोट

दरम्यान तेजस्विनी पंडितने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. काही दिवसांपूर्वी तेजस्विनीने ‘अथांग’ वेबसीरिजची निर्मिती केली आहे. त्यानंतर आता ती बांबू या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 10:31 IST
Next Story
प्रजासत्ताक दिनी अमृता खानविलकरची मोठी घोषणा, ‘या’ धावपटूच्या बायोपिकमध्ये झळकणार