Aindham Vedham ZEE5 Web Series ओटीटीवर क्राईम, कॉमेडी आणि नेहमीच्या थ्रिलर सीरिज बऱ्याच पाहायला मिळतात. पण जर तुम्हाला पौराणिक कथा म्हणजेच मायथॉलॉजी आणि सायन्स फिक्शन यांचा एक वेगळाच मिलाफ अनुभवायचा असेल, तर ‘ऐंधम वेधम’ (Aindham Vedham) ही मिस्ट्री थ्रिलर सीरिज तुमच्यासाठी एकदम परफेक्ट चॉईस आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या सीरिजचे भरभरून कौतुक होत आहे.
सीरिजची कथा
‘ऐंधम वेधम’ (Aindham Vedham) सीरिजच्या कथेची सुरुवात होते अनु नावाच्या एका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीपासून. आईच्या अंत्यसंस्कारासाठी ती वाराणसीला जाते. तिथे तिला एक अज्ञाताकडून जुना, रहस्यमय बॉक्स मिळतो. अयानगरापुरम गावातील एका पंडितापर्यंत हा डबा पोहोचवण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली जाते. मात्र, ती तिथे पोहोचण्याआधीच त्या पंडिताचा अचानक मृत्यू होतो. त्याच काळात, तब्बल १,००० वर्षांनंतर चार ग्रह एकाच रेषेत येण्याचा एक दुर्मिळ खगोलीय योग जुळून येतो. अनुला या भानगडीतून बाहेर पडायचं असतं, पण घटनांचे चक्र असे फिरते की ती नकळत या गूढ मोहिमेचा मुख्य भाग बनून जाते.
‘ऐंधम वेधम’मध्ये भूतकाळ आणि भविष्याची सांगड उत्तमरित्या घालण्यात आली आहे. कहाणी भूतकाळ आणि भविष्याला जोडणारी आहे. यामध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा देखील वापर करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये वाराणसीचे अध्यात्मिक सौंदर्य आणि तामिळनाडूतील अतिशय सुंदर मंदिरे दाखवण्यात आली आहेत. प्रत्येक ठिकाण सीरिजच्या कथेसोबत उत्तम प्रकारे जुळणारे आहे. यातील सिनेमॅटोग्राफी अतिशय शानदार असून, जुन्या ऐतिहासिक ठिकाणांपासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतच्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीने मांडल्या आहेत. ही सीरिज तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. यामध्ये जबरदस्त सरप्राइजिंग ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये येणारे नवे आव्हान, अनाकलनीय वळणे आणि अनपेक्षित ट्विस्ट्स प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतात.
कुठे पाहायची ही सीरिज?
तुम्ही ‘ऐंधम वेधम’ ही सीरिज झी५ (ZEE5) वर पाहू शकता. ही सीरिज तमिळ आणि तेलुगू व हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. ‘ऐंधम वेधम’च्या पहिल्या सीझनमध्ये एकूण ८ एपिसोड्स आहेत आणि प्रत्येक एपिसोड साधारण ४० ते ५० मिनिटांचा आहे. ही सीरिज झी५ च्या लोकप्रिय सीरिजपैकी एक असून तिला ७.१ इतके IMDb रेटिंग मिळाले आहे.
चित्रपटातील कलाकार
दिग्दर्शक नागा यांनी स्वतः ही कथा लिहिली आहे. तब्बल १० वर्षांपासून ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आकार घेत होती. अभिनेत्री साई धनशिखा हिने या सीरिजमधून ओटीटीवर यशस्वी पदार्पण केले असून मुख्य भूमिका उत्तम साकारली आहे. तिच्याबरोबर संतोष प्रथाप, विवेक राजगोपाल, वाय. जी. महेंद्रन, देवदर्शिनी आणि पोनवनन अशा दिग्गज कलाकारांची भक्कम साथ लाभली आहे.
