Ajmer files Web Series : १९९२ च्या अजमेर ब्लॅकमेल स्कँडलवर आता एक ववेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ब्लॅकमेलिंग प्रकरणामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची खुर्चीही धोक्यात आली होती. महाविद्यालयीन तरुणींचा एमएमएस व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देश हादरला. या घोटाळ्यात सहभागी असलेले लोक प्रतिष्ठित कुटुंबातील होते. त्यामुळे हे प्रकरण अतिशय हायप्रोफाईल बनले होते. आता इतक्या वर्षांनंतर त्यावर निघणाऱ्या वेबसीरिजमुळे पुन्हा हे प्रकरण चर्चेत आलं आहे.
अभिषेक दुधैया हे या वेबसीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. यावर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ही सीरिज प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अभिषेक टिप्स कंपनीच्या सहकार्याने याची निर्मिती करत आहे. नुकतीच त्यांनी याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन अधिकृत घोषणा केली आहे. अभिषेक दुधैया यांनी यापूर्वी ‘भुज – द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये अभिषेक यांनी अजय देवगण आणि संजय दत्त यांसारख्या मेगा स्टारसोबत काम केले आहे.




अजमेर ब्लॅकमेल स्कँडल नेमकं आहे तरी काय?
१९९२ साली अजमेरमध्ये जवळपास ३०० मुलींचे न्यूड फोटो व्हायरल झाले होते. यानंतर संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ माजली होती. आरोपी तरुण अजमेरमधील प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याने हे प्रकरण बऱ्यापैकी दाबलं गेलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे सर्व एका महाविद्यालयीन तरुणीपासून सुरू झाले. त्यानंतर सुमारे ३०० मुलींना ब्लॅकमेल करून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केलं गेलं.
राजस्थानच्या एका मोठ्या वृत्तपत्राने नग्न छायाचित्रांसह हे प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर मात्र संपूर्ण देशाचं लक्ष याच प्रकरणाकडे लागलं होतं. आजही या प्रकरणातील सगळ्या आरोपींना पकडण्यात यश आलेलं नाही. आता या घटनेवर आधारित ‘अजमेर फाइल्स’ ही वेबसीरिज या प्रकरणावर कितपत प्रकाश टाकणे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.