Netflix Trending Film Akhanda 2: Thaandavam: काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात, पण ओटीटीवर ते फारशी कमाल करू शकत नाही. तर काही मात्र बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतात आणि ओटीटीवर ट्रेंडिंग असतात. असाच एक चित्रपट आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर बजेटइतकीही कमाई केली नाही, पण ओटीटीवर तो ट्रेंडिंग आहे. या चित्रपटाचा पहिला भाग जिओ हॉटस्टारवर आणि आता आलेला दुसरा भाग नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय, तो मूळ तेलुगू चित्रपट आहे. २ तास ४४ मिनिटांच्या या चित्रपटाचे नाव ‘अखंडा 2’ आहे. बोयापती श्रीनू दिग्दर्शित या चित्रपटात नंदामुरी बालकृष्णन, संयुक्ता मेनन आणि हर्षाली मल्होत्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची कथा अखंडा (नंदामुरी बालकृष्णन) नावाच्या दैवी योद्ध्याभोवती फिरते.
अखंडाचा हेतू ध्येय जगाला विनाशापासून वाचवणे हा आहे. चित्रपटात एक शक्तिशाली डार्क फोर्स देखील दाखवण्यात आली आहे, जी जगात असंतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करते. अंखडाला या शक्तींचा सामना करण्याचे आणि जगात संतुलन राखण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
अखंडा २ चे बजेट व कलेक्शन
हा तेलुगू भाषेतील फँटसी अॅक्शन थ्रिलर चित्रपट १२ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट अंदाजे १२०-१५० कोटी रुपये होते. पण त्याने बॉक्स ऑफिसवर १२० कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे बजेटची पूर्ण रक्कमही तो वसूल करू शकला नव्हता.
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर, हा चित्रपट ९ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. त्यानंतर अवघ्या ४८ तासांतच तो टॉप १० ट्रेंडिंग चित्रपटांमध्ये सामील झाला आणि सध्या दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
अखंडा २ या चित्रपटाचे IMDb रेटिंग ६.० आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला त्याचा पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरला होता. पहिल्या भागाचे बजेट अंदाजे ५००-७०० कोटी रुपये होते आणि जगभरातील कलेक्शन १५० कोटी रुपये होते. तुम्ही तो पाहिला नसेल तर जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.
