scorecardresearch

चित्रपट फ्लॉप होणं अक्षय कुमारला पडलं महागात, ‘ओह माय गॉड २’बाबत निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘ओ माय गॉड २’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांच्याबरोबर अभिनेत्री यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

akshay kumar omg

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे जो वर्षाला किमान ५ ते ६ चित्रपट करतो. अक्षय कुमारची गणना बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. मात्र सध्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपट एकामागून एक फ्लॉप होताना दिसत आहे. त्यामुळे निर्मात्यांनी त्याच्या आगामी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

अक्षय कुमारचे ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतू’, ‘बच्चन पांडे’ हे चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाले. परंतु हे चित्रपट फारशी चांगली कामगिरी करु शकले नाही. तर नुकतंच प्रदर्शित झालेला त्याचा ‘सेल्फी’ या हा चित्रपटही अयशस्वी ठरला. म्हणून अक्षय कुमारला साईन केल्यावर चित्रपट हिटच होणार याबाबत आता निर्मात्यांही खात्री वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे आता चित्रपट फ्लॉप होणं हे अक्षयलाही महागात पडत आहे.

आणखी वाचा : “पैसा यांना काय काय करायला लावतो…” ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे सलमान खान व अक्षय कुमार ट्रोल

अक्षय कुमारचा आगामी ‘ओह माय गॉड २’ची खूप चर्चा आहे. या चित्रपटातून अक्षय कुमार लैंगिक शिक्षणाचे धडे देणार आहे. यावर्षी हा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल असं बोललं जात होतं. मात्र त्याचा हा आगामी चित्रपट निर्मात्यांनी थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हा चित्रपट ‘वूट’ किंवा ‘जिओ सिनेमा’वर प्रदर्शित केला जाईल. अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली नसली तरीही हा चित्रपट चित्रपट गृहात प्रदर्शित होणार नसल्याचं निश्चित झालं आहे.

हेही वाचा : “…तर चित्रपट पाहणार नाही”; ‘हेरा फेरी’च्या निर्मात्यांवर प्रेक्षक नाराज

अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात परेश रावल यांचीही महत्वपूर्ण भूमिका होती. त्यांच्या त्या भूमिकेचा खूप कौतुक झालं. तर आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये परेश रावल यांच्याऐवजी पंकज त्रिपाठींना कास्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर ‘ओ माय गॉड २’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांच्याबरोबर अभिनेत्री यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 16:55 IST