Alanna Panday: बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडेने ‘द ट्राइब’ नावाच्या शोमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आपले फोटोशूट आणि फॅशनमुळे चर्चेत राहणारी सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर अलाना आता अभिनय करताना दिसत आहे. बोल्ड आणि बिनधास्त अलानाने एक तिच्या अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अलानाने या शोमधील एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये दिसतं की अलाना तिच्या कुटुंबासह बसलेली आहे. तिने ब्रालेट आणि पांढऱ्या रंगाचे ट्राउजर घातले आहे. तिच्या या कपड्यांबद्दल तिचे वडील चिक्की पांडे कमेंट करतात, त्यानंतर अलाना काहीशी नाराज होत त्यांना उत्तर देते.

हेही वाचा – सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi जिंकल्यावर अंकिता वालावलकरची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मिळालेलं…”

नेमकं काय घडलं?

अलानाचे वडील चिक्की पांडे तिला म्हणतात, ‘तू शर्ट घालायला विसरलीस का?’ हे ऐकून अलाना थोडी अनकम्फर्टेबल होते. ती म्हणते, ‘काय बोलताय तुम्ही? या कपड्यांमध्ये काय प्रॉब्लेम आहे?’ त्यावर तिचे वडील म्हणतात, ‘तू शर्ट घालायची गरज आहे असं तुला वाटत नाही का.’ मग अलाना म्हणते, ‘हाच शर्ट आहे.’ तर चिक्की पांडे म्हणतात, ‘हे वांद्रे आहे, एलए नाही.’ मग अलाना म्हणते, ‘हे ब्रालेट आहे.’ तर चिक्की म्हणतात, ‘हे ब्रालेट आहे का? मग ब्रा तर नेहमी झाकलेलीच पाहिजे.’ अलानाचा हा व्हिडीओ ‘द ट्राइब’ या शोमधील आहे. या व्हिडीओत अलानाची आईदेखील दिसत आहे.

हेही वाचा – ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची यादी, वाचा…

अलानाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. लोक यावर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. दरम्यान, ‘द ट्राइब’ या शोबद्दल बोलायचं झाल्यास करण जोहरने निर्मिती केलेल्या या शोमध्ये इन्फ्लुएन्सर्सची गोष्ट दाखवण्यात आली आहे. काही एन्फ्लुएन्सर्स लॉस एंजेलिसमध्ये जातात आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंटचे शूटिंग कसे करतात हे यात प्रेक्षकांना पाहायला मिळते. हा शो प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. या शोमध्ये जावेद जाफरीची लेक अलाविया जाफरीदेखील आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा विजेता सूरज चव्हाणचे वय अन् शिक्षण किती? जाणून घ्या

अलाना पतीबरोबर लॉस एंजेलिसमध्ये राहते. अलानाने फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर आयव्हर मॅक्रे याच्याशी १६ मार्च २०२३ रोजी मुंबईत लग्न केलं होतं. ती काही महिन्यांपूर्वी आई झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.