आलिया भट्ट व शर्वरी वाघ या दोघींचा ‘अल्फा’ हा चित्रपट ३ जुलै रोजी थिएरमध्ये रिलीज झाला. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची चर्चा सुरू होती. अनेकदा रिलीज डेट बदलल्यानतंर अखेर चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. मात्र याला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अशातच आता आलिया व शर्वरी यांचा ‘अल्फा’ चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.
वायआरएफ निर्मित शिव रावैल दिग्दर्शित ‘अल्फा’ या चित्रपटाचं बजेट १२० ते १३० कोटी असल्याचं सांगितलं जातं. ‘अल्फा’ने बॉक्स ऑफिसवर हिंदुस्तानच्या वृत्तानुसार देशात ५७ कोटी ते जगभरात ९७ कोटींचा गल्ला जमावला आहे. थिएटरमध्ये जरी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी अनेकदा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांना ओटीटीवर चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. त्यामुळे आता ‘अल्फा’सुद्धा ओटीटीवर चांगला प्रतिसाद मिळणार का हे येत्या काळातच कळेल.
ओटीटीवर कधी व कुठे रिलीज होणार?
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार आलिया भट्ट व शर्वरी वाघ यांचा ‘अल्फा’ हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अद्याप चित्रपटाची अधिकृत रिलीज डेट जाहीर झाली नसली तरी ऑग्स्टमध्ये २८ तारखेला प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. कोणताही चित्रपट ४ ते ६ आठवड्यांनंतर ओटीटीवर रिलीज होतो. त्यामुळे ‘अल्फा’च्याबाबतीतही हाच अंदाजा लावला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘अल्फा’ थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट थेट ओटीटीवरच रिलीज होणार अशी चर्चा होती. मात्र बऱ्याच विलंबानंतर शेवटी चित्रपटगृहातच हा चित्रपट रिलीज झाला आणि आता अखेर ओटीटीवर पाहता येईल.
आलिया भट्टचा ‘अल्फा’ हा चित्रपट ३ जुलै रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार चित्रपटाने ९.१२ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी ११.५० कोटी, तर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सर्वाधिक १३.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. मात्र, त्यानंतर प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने कमाईवर परिणाम झाल्याचं म्हटलं जातं. पहिल्याच आठवड्यात चित्रपटाची दैनंदिन कमाई २ कोटी रुपयांपर्यंत घसरली. प्रदर्शनाच्या १७व्या दिवशी, म्हणजेच तिसऱ्या रविवारी, चित्रपटाने फक्त ६४ लाख रुपयांची कमाई केली. त्यामुळे आतापर्यंत ‘अल्फा’ची बॉक्स ऑफिसवरची एकूण कमाई ५७.१७ कोटी रूपयांची आहे.
