Alia Bhatt Sharvari Wagh Alpha Movie OTT Release Netflix Trending: दर आठवड्याला बॉक्स ऑफिसवर नवनवीन चित्रपट व सीरिज रिलीज होत असतात. यापैकी काही थिएटर्समध्ये फ्लॉप झालेलेही असतात. असाच एक चित्रपट सध्या नेटफ्लिक्स गाजवतोय. तगडी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. पण ओटीटीवर आल्यावर मात्र प्रेक्षक मोठ्या प्रमाणात हा चित्रपट पाहत आहेत.
२०२६ या वर्षात एकीकडे ‘धुरंधर २’, ‘कॉकटेल २’ आणि ‘आवारापन २’ सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली, तर दुसरीकडे मोठी स्टारकास्ट असूनही ‘बंटवारा १९४७’ आणि ‘भारत भाग्य विधाता’सारखे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. याच यादीतील सर्वात मोठा धक्कादायक फ्लॉप ठरलेला चित्रपट म्हणजे यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा ‘अल्फा’ (Alpha).
आलिया भट्ट, शर्वरी वाघ, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट तब्बल १२५ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, पण थिएटरमध्ये त्याला अवघी ५८ कोटींची कमाई करता आली. मात्र, २८ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी नेटफ्लिक्सवर रिलीज होताच या चित्रपटाचे नशीब पूर्णपणे पालटले आहे. सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्स इंडियावर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत असून ओटीटी प्रेक्षकांचा याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
फ्लॉप चित्रपट नेटफ्लिक्सवर नंबर-१
यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘अल्फा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला होता. ४ दिवसांपूर्वी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. ओटीटीवर येताच ‘अल्फा’चं नशीब पालटलंय. सध्या तो नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे.
अल्फा चित्रपटाचे बजेट व कलेक्शन
अल्फा चित्रपटात आलिया भट्ट शर्वरी वाघ, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ अभिनीत ‘अल्फा’ या चित्रपटाचे बजेट सुमारे १०० ते १२५ कोटी रुपये होते. मात्र त्या तुलनेत त्याचे कलेक्शन खूप कमी राहिले. या चित्रपटाने भारतात ५८ कोटी आणि जगभरात जवळपास ९८ कोटी रुपयांची कमाई केली.
अल्फा चित्रपट का फ्लॉप झाला?
‘अल्फा’मध्ये आलिया भट्ट देशाच्या शत्रूंना संपवणाऱ्या करणाऱ्या एका किलरच्या भूमिकेत आहे. तिच्या बहिणीची भूमिका शर्वरीने साकारली आहे. चित्रपटात दोन्ही अभिनेत्रींचे जबरदस्त ॲक्शन सीन्स आहेत, तरीही ती कथा प्रेक्षकांना बांधून ठेवू शकली नाही. आलियाच्या एकाच प्रकारच्या अभिनयामुळे ती ट्रोल झाली. तर त्याचबरोबर काहींच्या मते सिनेमाची कथा खूपच सुमार आहे.
