प्राइम व्हिडीओवर अलीकडे अनेक नवीन चित्रपट, वेब सीरिज प्रदर्शित झाले आहेत. तुम्ही मनोरंजनासाठी काहीतरी नवीन शोधत असाल, तर या १० चित्रपट आणि सीरिजचा वॉचलिस्टमध्ये नक्की समावेश करा. सस्पेन्स, थ्रिलर, अ‍ॅक्शन, रोमँटिक आणि कॉमेडी अशा विविध प्रकारच्या कलाकृती यामध्ये पाहायला मिळतील.

मिर्झापूर – ही सुपरहिट फिल्म गँगस्टर ड्रामावर आधारित असून, लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’चा सीक्वल आहे. या सीरिजला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली होती. पंकज त्रिपाठी, अली फजल आणि रसिका दुग्गल यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल, तर तो घरबसल्या प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

‘चार यार सीझन १’ – तुम्हाला सस्पेन्स आणि थ्रिलर आवडत असेल, तर ही सीरिज तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या सीरिजची कथा जय, टोनी, साहिल आणि समीर या चार मध्यमवर्गीय मित्रांभोवती फिरते. जयच्या गर्लफ्रेंडला मदत करण्यासाठी हे चौघे एका गँगस्टरकडून १० लाख रुपयांचं कर्ज घेतात. मात्र, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित घडामोडी घडू लागतात.

‘कॉमरेड कल्याण</strong>’ – हा एक तेलुगू अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये श्री विष्णू (कल्याण) आणि कॉमेडियन सत्य (दुबई बाबू) यांची जबरदस्त ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळते. या चित्रपटात कल्याण आपल्या प्रेयसीला मदत करण्यासाठी आणि कुटुंबावरील कर्ज फेडण्यासाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने नक्षलवादी असल्याचं नाटक करतो. मात्र, जेव्हा पोलीस त्याला खरंच नक्षलवादी समजू लागतात, तेव्हा कथेच खरं रंजक वळण येतं.

‘एपोकॅलिप्स झेड : न्यू वर्ल्ड’ – तुम्हाला मिलिटरी अ‍ॅक्शन चित्रपटांची आवड असेल, तर झॉम्बी या प्रकारातील हा चित्रपट नक्की पाहा. १ तास ३८ मिनिटांच्या या चित्रपटात अप्रतिम व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे.

‘ड्राइव्ह : द प्रिटेंडर्स’ – हा एक जर्मन रोमँटिक चित्रपट आहे. यामध्ये एका रेसर आणि कार मेकॅनिकमधील केमिस्ट्री पाहायला मिळते. सुरुवातीला एकमेकांचे शत्रू असलेले हे दोघे पुढे कसे मित्र बनतात, हे पाहणं रंजक ठरेल. तुम्हाला रोमँटिक चित्रपट आवडत असतील, तर या चित्रपटाचा तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की समावेश करा.

‘लव्ह इन डिसगाइज सीझन १’ – तुम्हाला के-ड्रामा पाहायला आवडत असतील, पण रोमँटिक कथांपेक्षा सस्पेन्स अधिक आवडत असेल, तर ही सीरिज नक्की पाहा. या ड्रामाची कथादेखील रंजक आहे. एका बिझनेस ग्रुपच्या लिडरला त्याच्या सेक्रेटरीच्या हत्येसाठी जबाबदार धरलं जातं. मात्र, या हत्येमागचा खरा गुन्हेगार कोण आहे, हे जाणून घेणं उत्कंठावर्धक ठरेल.तसेच यामध्ये प्रेमकाणीही पाहायला मिळते.

‘आय एम हँडसम (सिन्स २००९)’ – तुम्हाला भावनिक चित्रपट पाहायचा असेल, तर हा तेलुगू फॅमिली ड्रामा उत्तम पर्याय ठरू शकतो. या चित्रपटात एक तरुण प्रेम आणि नात्यांवरील विश्वास गमावलेल्या डॉक्टरला पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवायला लावण्याचा प्रयत्न करतो. या कथेत त्या तरुणाच्या वडिलांची भूमिकादेखील महत्त्वाची आहे.

‘द डार्क हेवन’ – ही मर्डर मिस्ट्री तुम्हाला खिळवून ठेवेल. या चित्रपटाची कथा एका अशा गावाभोवती फिरते, जिथे दर सात वर्षांनी जून महिन्यात पुरुषांचा मृत्यू होतो. मात्र, त्यांच्या मृत्यूमागचं कारण कोणालाच माहीत नसतं. या रहस्यमय घटनांमागचं गूढ कसं समोर येतं, हे पाहणं रंजक ठरेल. या कथेत तुम्हाला भरपूर सस्पेन्स पाहायला मिळेल.

‘मेक मी टिंगल सीझन १’ – हा एक रोमँटिक-कॉमेडी ड्रामा आहे. शारीरिक जवळीक आणि नात्यांबद्दल अगदी वेगवेगळे विचार असलेले दोन जण एका अ‍ॅडल्ट वेलनेस स्टार्टअप कंपनीच्या मार्केटिंगच्या निमित्ताने भेटतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय घडतं, हे पाहणं रंजक ठरेल. विशेष म्हणजे, या ड्रामामध्ये कोणताही अश्लीलपणा न दाखवता हा विषय मांडण्यात आला आहे.