IIT Graduate Actor Dating Rumours With 7 years older Actress: एकापेक्षा एक वेब सीरिज सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विविध आशय असलेले, अनेकविध जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज ओटीटीवर दर आठवड्याला प्रदर्शित होतात. यातील काही वेब सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.
आता अशीच एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘ग्राम चिकित्सालय’ असे या सीरिजचे नाव असून याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांसमोर काय आव्हाने येतात, यावर आधारित ही वेब सीरिज आहे.
७ वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीबरोबर अफेयरच्या चर्चा
या वेब सीरिजमध्ये अमोल पराशर प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्याबरोबर आकांक्षा रंजन कपूर, आनंदेश्वर द्विवेदी, आकाश मखीजा, विनय पाठक आणि गरिमा विक्रांत सिंग हे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.
अमोल पराशरने त्याच्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र, या अभिनेत्याचे शिक्षण किती झाले आहे, हे तुम्हाला माहित आहे का?
अभिनेत्याने २००९ मध्ये रणबीर कपूरच्या “रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर” या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर तो ‘बबलू हॅपी है’ आणि ‘ट्रॅफिक’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. मात्र, २०१६ मध्ये प्रदर्शित झालेली ‘टीव्हीएफ ट्रिपलिंग’या वेब सिरीजमधून त्याला खरी ओळख मिळाली. यामध्ये त्याने साकारलेली चितवन ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.
अमोलने बॉलीवूड चित्रपटांत कमी काम केले असले तरी तो ओटीटीवर चांगले काम करत आहे. त्याने डॉली किट्टी, वो चमकते सितारे, सरदार उधम, कॅश, ३६ फार्महाऊस, स्वीट ड्रीम्स अशा चित्रपट आणि ‘कुल: द लिगसी ऑफ द रेजिंग हाऊस’, ‘ग्राम चिकित्सालय’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. त्याच्या भूमिकांना पसंती मिळाली आहे.
अभिनेत्याच्या शिक्षणाबद्दल बोलायचे तर त्याने आयआयटी दिल्लीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे. चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी त्याने झेडएस असोसिएट्समधील चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडली.
काही दिवसांपूर्वी अमोल लोकप्रिय अभिनेत्री कोंकणा सेनला डेट करत असल्याचा चर्चांना उधाण आले होते. कोंकणा ४६ वर्षांची आहे आणि अमोल ३९ वर्षांचा आहे. अमोल अभिनेत्रीपेक्षा सात वर्षांनी लहान आहे. जेव्हा या चर्चांबद्दल त्याला विचारले तेव्हा त्याने या अफवा असल्याचे म्हणले होते.

