या वीकेंडला काही तरी विनोदी पाहायचा विचार करत असाल तर ओटीटीवर ट्रेंडिंग एक चित्रपट तुम्ही पाहू शकता. अत्यंत कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने आधी बॉक्स ऑफिस गाजवलं आणि आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही ट्रेंडिंग आहे. हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. सध्या तो ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करतोय. हा चित्रपट कोणता, त्याची कथा काय आहे आणि त्याचे बजेट व बॉक्स ऑफिस कलेक्शन, तसेच तो कुठे पाहता येईल? ते जाणून घेऊयात.
या चित्रपटातील कथा आधी श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या एका आळशी तरुणावर आधारित आहे. त्याचं नाव राजू असतं. राजू ही भूमिका नवीन पॉलिशेट्टीने साकारली आहे. राजू आधीप्रमाणेच आलिशान आयुष्य जगण्यासाठी चारुलता नावाच्या एका श्रीमंत तरुणीशी लग्न करण्याचा प्लॅन करतो. पण इथेच मोठा ट्विस्ट येतो. पैशांसाठी लग्न करणाऱ्या राजूला समजतं की त्याला वारशात पैसे नाही तर कर्ज मिळालंय. त्यानंतर कथेत वळण येतं. मग तो चारूलताबरोबर राहतो की नाही? दोघे प्रेमात पडतात की वेगळे होतात की राजू आणखी काही करतो? ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.
चित्रपटाचे नाव काय?
आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय, त्याचे नाव अनगनगा ओका राजू (Anaganaga Oka Raju) आहे. हा २०२६ मध्ये रिलीज झालेला एक तेलुगू कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. मारी याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती सूर्यदेवरा नागा वामसी व साई सौजन्याने केली आहे.
या चित्रपटात नवीन पोलीशेट्टी व मीनाक्षी चौधरी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट १४ जानेवारी २०२६ रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर महिनाभराने म्हणजेच ११ जानेवारी रोजी तो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे.
‘अनगनगा ओका राजू’चे बजेट व बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘अनगनगा ओका राजू’ या चित्रपटाचे बजेट ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. होय. कारण या सिनेमाचे बजेट फक्त ८ कोटी रुपये आहे. या चित्रपटाने बजेटच्या १० पट कमाई केली होती. ‘अनगनगा ओका राजू’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत तब्बल ८३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही ट्रेंडिंग आहे.

