Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वात नवं आणि काहीतरी हटके पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाचं होस्टिंग अभिनेते अनिल कपूर करणार आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या चाहत्यांमध्ये ओटीटीचं हे पर्व पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. सध्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात कोण सहभागी होणार आहे? याविषयी चर्चा रंगली आहे. अनेक नावं समोर आली आहेत. पण ही नावं निर्मात्यांकडून अद्याप घोषित झालेली नाही.

दिल्लीची लोकप्रिय वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जातं आहे. निर्मात्यांनी तिला या शोसाठी विचारणा केली आहे. अशातच चंद्रिका दीक्षित नुकतीच मुंबई विमातळावर दिसली. त्यामुळे आता चंद्रिका ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात झळकण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – “बाबा आहेस तू”, मंजिरी ओकने ‘फादर्स डे’निमित्ताने लिहिलेल्या सुंदर पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “मुलं मोठी झाली पण प्रसाद तू…”

चंद्रिका दीक्षितसह कच्चा बादाम गर्ल म्हणजेच अंजली अरोरा ‘बिग बॉस ओटीटी’च्या या पर्वात सहभागी होणार असल्याचं वृत्त आलं आहे. ‘द फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, अंजली अरोराची देखील ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वात एन्ट्री निश्चित झाली आहे. याआधी अंजली अरोरा कंगना रणौत यांच्या ‘लॉक अप’ शोमध्ये झळकली होती. या शोमध्ये अंजली व मुनव्वर फारुकीचं खूप चांगलं बॉन्ड पाहायला मिळणार होतं. एवढंच नव्हेतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

हेही वाचा – Video: ‘अप्पी आमची कलेक्टर’मधील सिंबाने ‘फादर्स डे’ निमित्ताने अर्जुनला दिलं गोड सरप्राइज, व्हिडीओ व्हायरल

अंजलीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ‘श्री रामायण कथा’च्या माध्यमातून ती सिनेसृष्टीत पाऊल ठेवतं आहे. या चित्रपटात ती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक सिंह हे चित्रपटाचं दिग्दर्शक करणार असून प्रकाश महोबिया, संजय बुंदेला या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळणार आहे. याबाबत अंजलीनं स्वतः जाहीर केलं होतं.

बिग बॉस ओटीटी ३ कधीपासून सुरू होणार?

‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व २१ जूनपासून रात्री ९ वाजता ‘जिओ सिनेमा’वर पाहता येणार आहे. मागील दोन पर्व जिओ सिनेमावर मोफत होते. पण आता ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.