Survival Thriller Hollywood Movie Trending On Netflix : अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर एक नवीन हॉलीवूड चित्रपट रिलीज झाला आहे. ही सर्व्हायवल थ्रिलर प्रकारातील फिल्म आहे, पण फक्त एक तास ३५ मिनिटांच्या या चित्रपटाने आपल्या उत्कृष्ट कथेमुळे भारतीय प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे आणि सध्या नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
महत्त्वाचं म्हणजे नेटफ्लिक्सवर ट्रेंड होत असलेल्या या हॉलीवूड चित्रपटाने भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील ९ लोकप्रिय चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. त्यामुळे हा चित्रपट नेमका कोणता आहे, याची कथा कशी आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग आहे ‘हा’ हॉलीवूड सिनेमा
आम्ही ज्या हॉलीवूड चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो गेल्या आठवड्यात २४ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या सर्व्हायवल थ्रिलर चित्रपटाचं नाव “एपेक्स” आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन बाल्टासर कोर्माकुर (Baltasar Kormákur) यांनी केलं आहे, तर याची कथा (स्क्रीनप्ले) जेरेमी रॉबिन्स (Jeremy Robbins) यांनी लिहिली आहे.
ओटीटीवर ट्रेंडिंग असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटात हॉलीवूड सुपरस्टार चार्लीज थेरॉन (Charlize Theron), टॅरॉन एगर्टन(Taron Egerton )आणि एरिक बाना (Eric Bana) यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या एका आठवड्यापासून ‘एपेक्स’ (Apex)हा चित्रपट नेटफ्लिक्सवर देश-विदेशातील प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत आहे.
‘या’ ९ भारतीय चित्रपटांना टाकलं मागे
यामुळेच हा हॉलीवूड चित्रपट सध्या नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंग १० चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ‘एपेक्स’ (Apex) ने ज्या इतर ९ भारतीय चित्रपटांना मागे टाकलं आहे, त्यामध्ये दो दिवाने सहर में’, ‘युथ’, ‘टोस्टर’, ‘उस्ताद भगत सिंह’, ‘धुरंधर’, ‘दि बोन टेम्पल’, ‘नी फॉरेवर’, ‘तू या में’, ‘मर्दानी ३’ हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे.
सर्व्हायवल थ्रिलर चार्लीज थेरॉन स्टारर ‘एपेक्स’ (Apex) प्रेक्षकांची पहिली पसंता बनला आहे. या चित्रपटाची कथा पाहिली तर, ही एका रॉक क्लाईंबरची गोष्ट आहे. ती जंगलात जिवंत राहण्यासाठी झुंज देताना शिकाऱ्यांच्या तावडीत सापडते. एक धोकादायक शिकारी तिच्या मागे लागतो, आणि त्यापासून वाचण्यासाठी ती घनदाट जंगलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसते.
