Watch These 5 Hindi Romantic Movies on OTT: अनुराग बासू दिग्दर्शित ‘लाइफ इन मेट्रो’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. कथानक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे हा सिनेमा चांगलाच गाजला. आता या चित्रपटाचा सिक्वेल ‘मेट्रो इन दिनों’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, अली फझल, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, नीना गुप्ता, अनुपम खेर हे कलाकार दिसणार आहेत. चार लव्ह स्टोरी या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ४ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अशा काही रोमँटिक चित्रपटांविषयी जाणून घेऊ, जे मोठ्या प्रमाणात गाजले. आजही या चित्रपटांची प्रेक्षकांवर भुरळ आहे. तसेच आता हे चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहेत.

१. रांझणा

आनंद एल राय दिग्दर्शित रांझणा या चित्रपटात कुंदन व झोया यांची गोष्ट पाहायला मिळते. कुंदनचे झोयावर एकतर्फी प्रेम असते, तर झोया व अक्रम यांचे एकमेकांवर प्रेम असते. चित्रपटात कुंदन ही भूमिका अभिनेता धनुषने साकारली आहे. झोयाच्या भूमिकेत सोनम कपूर आहे, तर अक्रमच्या भूमिकेत अभिनेता अभय देओल आहे. या चित्रपटात अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात. सामाजिक विषमता, नातेसंबंधातील गुंतागूंत पाहायला मिळते.

रांझणामधील तुम तक, बनारसिया अशी गाणी लोकप्रिय ठरली आहेत. हा चित्रपट झी ५ आणि जिओ सिनेमावर उपलब्ध आहे.

२. जब वी मेट

इम्तियाज अलींचा ‘जब वी मेट’ हा सिनेमा कितीही वेळा पाहिला तरी जुना होत नाही. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. आदित्य व गीत यांची लव्हस्टोरी आजही प्रेक्षकांना भुरळ पाडते, त्यामुळे ‘जब वी मेट’ हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे दिसते. शांत, मृदू आवाजात बोलणारा आदित्य आणि बडबड करणारी, गोंधळ घालणारी गीत यांची जोडी या चित्रपटात दिसते.

आदित्य ही भूमिका अभिनेता शाहिद कपूरने साकारली आहे, तर गीतच्या भूमिकेत करीना कपूर दिसते. हा चित्रपट सध्या जिओ सिनेमावर उपलब्ध आहे. याबरोबरच झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील हा सिनेमा पाहता येतो.

३. शादी में जरुर आना

राजकुमार राव आणि किर्ती खरबंदा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘शादी में जरुर आना’ हा चित्रपट लोकप्रिय ठरला आहे. राजकुमार रावने सत्येंद्र ही भूमिका साकारली आहे, तर कीर्तीने आरती ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट झी ५ आणि अमॅझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

४. रॉकस्टार

इम्तियाज अली यांचा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट ‘रॉकस्टार’ हा गाजलेल्या अशा रोमँटिक चित्रपटांपैकी आहे. या चित्रपटात नर्गिस फाखरी, रणबीर कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट जिओ सिनेमा, झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. करीब करीब सिंगल

‘करीब करीब सिंगल’ हा इरफान खान आणि पार्वती थिरुवोथु यांची प्रमुख भूमिका असलेला एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. दिवगंत अभिनेते इरफान खान या चित्रपटात योगी या भूमिकेत दिसतात, तर पार्वती जया या भूमिकेत दिसतात. ते एका डेटिंग वेबसाइटवर भेटतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन तनुजा चंद्रा यांनी केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.