बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानने त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी आणि एकूणच चित्रपट रसिकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. चित्रपटगृहात इतिहास रचल्यानंतर आता ‘पठाण’च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनाची सगळेच आतुरतेने वाट बघत होते. प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली आहे. शाहरुख खानचा एका नवा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे.
शाहरुख खान कायमच आपल्या चाहत्यांसाठी हटके गोष्टी करताना दिसून येतो. चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याआधी शाहरुख खानचा एका नवा प्रोमो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या प्रोमोमध्ये YouTuber भुवन बामदेखील दिसत आहे. हा एका मजेशीर व्हिडीओ आहे. ज्यात शाहरुख खान प्रोमो चित्रित करताना दिसत आहे तर भूवम बाम त्याला संवाद सांगताना दिसत आहे.
…अन् शाहरुखच्या ‘या’ चित्रपटात राणी मुखर्जीने ऐश्वर्याला केलं रिप्लेस; सेटवर नेमकं काय घडलं होतं
शाहरुख व्हिडीओमध्ये ‘पठाणम’धला संवाद पुन्हा म्हणतात दिसत आहे, “अपनी कुर्सी की पेटी बांध लो” मात्र हे बोलताना तो स्वतःच निराश होतो. “तुम्ही लोक प्रमोशनमध्ये चित्रपटाचे संवाद का वापरता? तुम्ही काहीतरी नवीन विचार का करू शकत नाही?” असे भुवनला सांगतो आणि त्याच्यावर ओरडतो मग भुवन शाहरुखला वेगवेगळ्या पद्धतीने संवाद म्हणण्यास सांगतो. आणि अखेर शाहरुख त्याच्या स्टाईलमध्ये संवाद म्हणतो
‘पठाण’ आता हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून सोशल मीडियावर याबद्दल चांगलीच चर्चा होत आहे. एसएस राजामौली यांचा ‘बाहुबली २’ चित्रपट २८ एप्रिल २०१७ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, त्याच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर ५१०.९९ कोटींची कमाई केली होती.
शाहरुख खानच्या या चित्रपटात दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत आहे, तर जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत आहे. शाहरुख आणि जॉनने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट येत्या २२ मार्च रोजी ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.