Best Family Web Series on OTT: चित्रपट किंवा सीरिज म्हटलं की हिरो, व्हिलन, कट-कारस्थान आणि सस्पेन्स या गोष्टी आल्याच. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा काही भन्नाट वेब सीरिज आहेत, ज्यामध्ये यातलं काहीच नसलं तरीही त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. ‘गुल्लक’, ‘पंचायत’, ‘ये मेरी फॅमिली’, ‘दुपहिया’, ‘होम शांती’, ‘द आम आदमी फॅमिली’ आणि ‘घर वापसी’ यांसारख्या कौटुंबिक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. सर्वसामान्यांच्या घरातील लहान-मोठे वाद, नात्यांमधील ओलावा, करिअरचा तणाव आणि स्वप्नांची गुंफण या सीरिजमध्ये उत्तमरित्या मांडण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी कौटुंबिक मनोरंजनाचा चांगला पर्याय ठरत आहे.

गुल्लक (सीझन १ ते ५)

गुल्लक हा ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय फॅमिली शो आहे. या शोमधील लहान-मोठे वाद आणि अडचणी सर्वसामान्यांना रिलेट होतात. पैशांविषयी घरात होणारी चर्चा असो किंवा भावा-बहिणींमधील लहान-लहान भांडणं, या गोष्टी ‘गुल्लक’मधील मिश्रा कुटुंबा पाहायला मिळतात. ही सीरिज तुम्ही अमेझॉन प्राइम व्हिडीओ व सोनी लिव्हवर पाहू शकता.

पंचायत सीझन १ ते ४

फुलेरा गाव, तिथलं राजकारण, लहान-लहान गोष्टींवरून होणारे वाद आणि सचिव जीच्या अडचणी, या गोष्टी पंचायतमध्ये उत्तमरित्या मांडण्यात आल्या आहेत. ही सीरिज पाहताना स्क्रीनवरून नजर हटत नाही. पंचायत सीरिज प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

दुपहिया सीझन १ व २

धडकपूर नावाच्या गावाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा चित्रपट आहे. लोकांच्या अडचणी आणि त्यातून निर्माण होणारे विनोद हे यात पाहायला मिळतात. ही सीरिज प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

ये मेरी फॅमिली सीझन १ ते ४

हा शो एका सामान्य भारतीय घरात मोठं होतानाच्या आठवणी जागवतो. एका भारतीय कुटुंबात बालपण घालवण्याचा अत्यंत साधा अनुभव ‘ये मेरी फॅमिली’ने खूप खास आणि संस्मरणीय बनवला आहे. वेगवेगळ्या सीझन्समध्ये वेगळे कुटुंब आणि वेगळे कलाकार दिसले असले, तरी शोची मूळ भावना कधीही बदलली नाही.

होम शांती

फॅमिली ड्रामाची सुरुवात करण्यासाठी एक घरसुद्धा पुरेसं ठरू शकते. जेव्हा एखाद्या सामान्य कुटुंबाचं सर्वात मोठं स्वप्न फक्त स्वतःचं घर बांधणं हेच असते, तेव्हा काय-काय घडतं? ‘होम शांती’ ची साधी कथा कुटुंब, पैसे, अपेक्षा आणि वेगवेगळ्या पिढ्यांच्या स्वप्नातील घराच्या कल्पनेशी जोडते. ही सीरिज जिओहॉटस्टारवर उपलब्ध आहे.

द आम आदमी फॅमिली (सीझन १ ते ४)

सामान्य असणं हीच या कथेची सर्वात मोठी खासियत आहे. ‘द आम आदमी फॅमिली’मधील शर्मा कुटुंब हे साधारण कुटुंब आहे. आई-वडील, मुलं, नातेसंबंध, घरातील छोटे-मोठे मतभेद, स्वप्ने आणि एकत्र राहताना येणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणींभोवती याची कथा फिरते. ही सीरिज झी5 वर उपलब्ध आहे.

घर वापसी

कधीकधी खरी कथा तेव्हा सुरू होते, जेव्हा तुम्ही आपल्या घरी परतता. ‘घर वापसी’ सामान्य आयुष्याला एका रंजक कथेत बदलण्याच्या कल्पनेला एका वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवते. कथेतील मुख्य पात्र बंगळुरूमध्ये नोकरी गमावल्यानंतर आपल्या शहरात परत येतो. जी घटना केवळ करिअरमधील एक धक्का बनून राहू शकली असती, ती हळूहळू कुटुंब, अपेक्षा, ओळख आणि यशाचा खरा अर्थ सांगते.