Best Movies On Prime Video: आज १ नोव्हेंबर रोजी ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ हे दोन मोठे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. दिवाळी असल्याने सुट्ट्या आहेत. काही लोक थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत, तर काही लोक घरी बसून कुटुंबाबरोबर दर्जेदार वेळ घालवणं पसंत करतायत.

तुम्हालाही जर चित्रपट पाहायची आवड असेल पण थिएटरमध्ये जाण्याऐवजी घरीच बसून सिनेमे बघायचा तुमचा प्लॅन असेल तर प्राइम व्हिडीओवर काही उत्तम चित्रपट आहेत. ॲक्शन, ड्रामा, हॉरर या विविध जॉनरच्या टॉप ५ चित्रपटांची यादी पाहुयात.

Psychological Thriller Films On Hotstar
‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Underrated Thriller Movies on OTT
‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
thangalaan buchingham murders agent ott release novembar
थिएटरमध्ये रिलीज झाले, पण ओटीटीवर रखडलं प्रदर्शन; अखेर घरबसल्या पाहता येणार ‘हे’ गाजलेले चित्रपट
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”

तुंबाड

Tumbbad on Prime Video : हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ चित्रपटगृहात दाखल झाला आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास अजून वेळ आहे, परंतु जर तुम्हाला हॉरर चित्रपटांची आवड असेल तर तुम्ही ओटीटीवर ‘तुंबाड’ पाहू शकता. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर सहा वर्षांनी २०२४ मध्ये पुन्हा रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

हेही वाचा – नोव्हेंबर महिन्यात OTT वर येणार जबरदस्त चित्रपट अन् सीरिज; वाचा कलाकृतींची यादी

आंखों देखी

Aankhon Dekhi on OTT: २०१३ मध्ये रिलीज झालेला रजत कपूर आणि संजय मिश्रा स्टारर कॉमेडी चित्रपट ‘आँखों देखी’ लोकांना त्यावेळी खूप आवडला होता. या सिनेमात तुम्हाला कॉमेडी आणि ड्रामा तर पाहायला मिळतोच पण हा सिनेमा तुम्हाला खूप महत्त्वाचा धडा शिकवतो. तुम्ही हा सिनेमा प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

ट्रॅप्ड

Trapped on OTT: राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला ‘ट्रॅप्ड’ चित्रपट हा २०१६ साली रिलीज झालेला एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटातील त्याचा अभिनय लोकांना आवडला होता. यात त्याचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन लक्षवेधी ठरले होते. हा चित्रपटही ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

‘फँड्री’तील शालू-जब्या गुपचूप लग्नबंधनात? राजेश्वरी खरातच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, “हे कधी झालं…”

न्यूटन

Newton on OTT: हादेखील राजकुमार रावचाच सिनेमा आहे. २०१७ मध्ये आलेल्या ‘न्यूटन’ चित्रपटात त्याची मुख्य भूमिका होती. या चित्रपटात पंकज त्रिपाठीसुद्धा होता. तुम्ही हा सिनेमा प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

अ डेथ इन द गूंज

A Death In The Gunj on OTT: ‘अ डेथ इन द गुंज’ हा सिनेमा २०१६ मध्ये रिलीज झाला होता. यात विक्रांत, कल्की आणि रणवीर शौरीसह अनेक स्टार्स होते. हा चित्रपट एक थ्रिलर ड्रामा आहे, जो तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

Story img Loader